130 voters in one house Anil Deshmukh attacks the government : एका घरात १३० मतदार, पोलिस आयुक्तांच्या घरातही नोंदी
Nagpur : महाविकास आघाडीच्या भव्य मोर्चाच्या पार्श्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवडणूक आयोग आणि सरकारवर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी सरकारला कठोर इशारासुद्धा दिला आहे. मुंबईत आयोजित मोर्चात बोलताना देशमुख म्हणाले की, विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले आहेत. मतचोरीही झाली आहे.
आज सकाळी नागपुरात (१ नोव्हेंबर) यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले की, मतदार याद्यांमध्ये भयंकर गोंधळ आहे. एका घरात तब्बल १३० मतदार दाखवले गेले आहेत. इतकेच नव्हे तर मुंबई व नवी मुंबई पोलिस आयुक्तांच्या घरांमध्येही अशाच प्रकारच्या नोंदी आढळल्या आहेत. मतदार याद्यांतील चुका प्रथम दुरूस्त करा, त्यानंतरच निवडणुका घ्या. त्यासाठी आणखी अवधी लागला तरी चालेल. असे न झाल्यास नागरिकांचा विश्वास निवडणूक प्रक्रियेवरून उडून जाईल.
Irregularities in Voter Lists : मृत्यूनंतरही पंधरा वर्षे मतदार यादीत नाव
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. जेव्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी आश्र्वासन दिलं होतं की आमचं सरकार आलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. आता त्यांचच सरकार आलं आहे. मग दिलेलं आश्र्वासन का पाळत नाहीत, असा सवाल देशमुख यांनी केला. शेतकरी दिवसेंदिवस संकटात सापडत आहे. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची तारीख तरी पाळावी. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
Sampada Munde Scicide case : डॉ. संपदा मुंडेंना न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही!
महाविकास आघाडीतील ऐक्याबाबत बोलताना देशमुख म्हणाले की, शिवसेना, मनसे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना सर्वच नेते मोर्चात सहभागी आहेत. आघाडीतील सर्वच पक्ष आजही एकदिलाने लढत आहेत. महाविकास आघाडीचा मोर्चा या सर्व मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेऊन सरकारला घेरणार आहे, असेही अनिल देशमुख म्हणाले.








