Ajit Pawar’s ministers are being targeted by BJP : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी डिवचले
Nagpur उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे धनंजय मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. अजित पवारांचे इतर आमदार कोणत्या तरी कारणांनी चर्चेत असतात. मात्र मुंडे यांना अडकविण्यामागे षडयंत्र तर नाही ना अशी शंका माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी उपस्थित केली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बोलताना भाजपवर शंका व्यक्त केली. अजितदादांच्या मंत्र्यांना लक्ष्य केले जात आहे. धनंजय मुंडे यांच्याआधी देखील काहींना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे या सगळ्या षडयंत्रामागे भाजप तर नाही ना अशी शंका अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. भाजपमधील अनेकांना मंत्री होण्याची इच्छा आहे. त्यामुळेच अजितदादांना जेरीस आणण्यासाठी तर त्यांना लक्ष्य केले जात नाही ना अशी शंका अनिल देशमुख यांनी उपस्थित करण्यात आली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील राज्य सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टवर चालवण्यात यावे. या प्रकरणातील चौकशी जलदपणे पूर्ण करावी. या चौकशीतून निष्कर्ष लोकांसमोर यावा आणि धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे अनिल देशमुखांनी म्हटले.
अनिल देशमुख यांनी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी मतदारांच्या संख्येतील तफावत सांगितली. हे ७० लाख वाढलेले मतदान कुठुन आले त्यावर त्यांनी संशय व्यक्त केला. महाराष्ट्र सरकार ईव्हीएम सरकार आहे. चार महिन्यात मतदार कसे वाढले याची माहिती नावासह दिली पाहिजे, अशी मागणीदेखील त्यांनी केली.