Breaking

Anil Deshmukh : भाजपच्या सांगण्यावरूनच अक्षय शिंदेचा एन्काऊन्टर

 

Akshay Shinde’s encounter on BJP’s orders : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा खळबळजनक आरोप

Nagpur अक्षय शिंदे एन्काऊन्टर प्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केल्याने राजकारण तापले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात भाजप व सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. बदलापूर येथे ज्या शाळेत चिमुकलीवर अत्याचार झाला ती शाळा भाजपशी संबधित होती. त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा पोलिसांना सांगून एन्काऊंटर करण्यात आल्याचा खळबळनजक आरोप त्यांनी केला आहे.

आरोपी शिंदेने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या नाही तर त्याला पोलिसांनी मारले. हे मी आधीच सांगितले होते. ज्या शाळेत चिमुलकीचे लैंगिक शोषण झाले ती शाळा भाजपच्या मंडळींची होती. त्यांना वाचवण्यासाठी शिंदेचा एन्काऊंटर करायला लावला काय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Maharashtra Congress : काँग्रेसचा अंतर्गत वाद टोकाला; एकमेकांना केले जातेय टार्गेट!

बदलापूरच्या शाळेतील अत्याचाराचे प्रकरण चांगलेच गाजले होते. सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतरही ते उघडकीस आले. शाळेत साफसफाई करणाऱ्या अक्षय शिंदेला आरोपी बनवण्यात आल्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते. या दरम्यान शाळेच्या संचालकावरही संशय व्यक्त केला जात होता. आता न्यायदंडाधिकारी यांनी शिंदे यांने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या हे पोलिसांचे म्हणणे संशयास्पद वाटते. असा निष्कर्ष देण्यात आल्याने पुन्हा हे प्रकरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

PM Narendra Modi : एका घरात एकालाच मिळणार पीएम किसानचे पैसे!

पोलिसांच्याजवळ असलेले रिवॉल्व्हर काढून कोणी गोळ्या झाडू शकत नाही. ते लॉक असते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी मी केली होती. मी व्यक्त केलेली शंका खरी ठरल्याचे न्यायदंडाधिकाऱ्याच्या निष्कर्षावरून दिसते. अक्षय शिंदेने ज्या बंदुकीने स्वतःला मारून घेतले, त्यावर त्याचे फिंगरप्रिंट नव्हते. हे एन्काऊंटर कोणी केला? कोणाला सांगून केले? कोणाला वाचवण्यासाठी केले? हासुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत.