Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला बनावट !

Attack Was Fake, Claims Nagpur Rural Police in Court: नागपूर ग्रामीण पोलिसांचा न्यायालयात दावा

Nagpur : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी हल्ला करण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती आणि देशमुख यांनी स्वतः या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला होता. पण हा हल्ला बनावट असल्याचा दावा नागपूर ग्रामीण पोलिसांनी केला आहे. तशी माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केली आहे.

अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे बनाव असल्याचा दावा नागपूर ग्रामीण पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी B Final Report न्यायालयात सादर केला आहे. यामध्ये पोलिसांनी म्हटलं आहे की, जर अनिल देशमुख यांच्या कारवर दगड खरोखर मारला गेला असता, तर तो कारच्या मागच्या किंवा मधल्या सीटवर पडला असता, मात्र प्रत्यक्ष घटनेच्या वेळी दगड पुढच्या सीटवर होता. काटोल येथे अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या प्रकरणात फॉरेन्सीक तपासणीमध्ये कुठलाही ठोस पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे हा हल्ला बनावट आहे, असे पोलिसांना स्पष्ट केले आहे.

Mumbai Attack : म्हणून मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई केली नाही !

घटना घडल्यानंतर देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उज्वल भोयर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ज्या फोर्ड इन्डीवर कारवर दगड मारण्यात आले होते, त्या कारमध्ये अनिल देशमुख एकटेच बसले होते, अशी माहिती पोलिसांनी त्यावेळी घटनेनंतर दिली होती. जे दगड कारवर मारण्यात आले होते, तसे दगड त्या परिसरात आहेत की नाही, याचीही तपासणी पोलिसांनी तेव्हा केली होती. त्यामध्ये घटनास्थळापासून ५० ते ७० मीटर अंतरावर तसे दगड आढळले होते. जो दगड कारच्या समोरील काचावर मारण्यात आला होता, तो सात ते आठ किलो वजनाचा असल्याचीही माहिती तेव्हा पोलिसांनी दिली होती. आता हा हल्लाच बनावट असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याकडून यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.