Sanjay Raut’s Name Must Appear in the Kondhali List : ते आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते, जाणीवपूर्वक त्यांचे नाव कापले
Nagpur : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांच्या तगड्या उमेदवारांची नावे कापण्याचे छडयंत्र भारतीय जनता पक्षाकडून रचले गेले आहे. आमच्या संभाव्य उमेदवारांची नावे कशा पद्धतीने कमी करता येतील, याचे प्रयत्न भाजपकडून झालेले आहेत. आमचे संजय राऊत कोंढाळी ग्रामपंचायतीमध्ये सदस्य राहिलेले आहेत आणि आमचे नगरपंचायतीचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यांनी निवडणूक लढू नये म्हणून हे षडयंत्र भाजपने रचले आहे, असा गंभीर आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
यासंदर्भात नागपुरात आज (२३ ऑक्टोबर) पत्रकारांशी अनिल देशमुख यांनी संवाद साधला. ते म्हणाले, संजय राऊत यांचे नाव यादीतून कापताना कोणतेही दस्तावेज जोडण्यात आलेले नाही. यासंदर्भात हिअरींग लावायला पाहिजे आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे. सरकारने या प्रकरणाची चौकशी तर करावीच. पण आमच्या संजय राऊत यांचे नाव कोंढाळीच्या यादीमध्ये आलेच पाहिजे, यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. ही तांत्रिक चूक नाही, तर षडयंत्र आहे. नाव डिलिट करताना कुठलाही नियम पाळला गेला नाही.
Doctor suicide case : साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्येने महाराष्ट्र हादरला
भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य मी ऐकले. ते येवढे अज्ञानी असतील, असं वाटलं नव्हतं. कुणालाही कुणाचाही फोन सर्व्हीलन्सवर टाकता येत नाही. कुणाचाही फोन सर्व्हीलन्सवर टाकायचा असेल तर अॅडिशनल होम सेक्रेटरी यांची परवानगी घ्यावी लागते. त्यांची परवानगी घेतल्याशिवाय असे काहीही करता येत नाही. याची माहिती राज्याच्या महसूल मंत्र्यांना नसावी, याचे आश्चर्य वाटते, असे म्हणत अनिल देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला हाणला.
Bharat taxi seva : देशातील पहिली सहकारी ‘भारत टॅक्सी’ सेवा लाँच!!
२०१९ मध्ये राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांचे फोन टॅप केले होते. मी त्यावेळी गृहमंत्री होतो. या प्रकरणाची मी चौकशी लावली होती. त्यामुळे बावनकुळे यांनी थोडी माहिती घेऊन बोलावे, काहीही वक्तव्य करू नये, असा सल्ला अनिल देशमुख यांनी दिला. पक्षांतर्गत बाबींसाठीदेखील सर्व्हीलन्स लावता येत नाही. येवढेच काय तर स्वतःच्या पत्नीचाही फोन सर्व्हीलन्सवर लावता येत नाही. त्यामुळे बावनकुळे साहेबांनी आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करू नये, असेही अनिल देशमुख म्हणाले.








