Anil Deshmukh expressed concern about farmers in Maharashtra : अनिल देशमुखांनी व्यक्त केली चिंता
Nagpur : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जमीन करीत कमी होत चालली आहे. लोकांचा ओढा हा शहराकडे वाढत चाललेला आहे.. काही राज्यांत शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र महाराष्ट्रात ती कमी होत आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
यासंदर्भात आज (१७ मार्च) नागपुरात पत्रकारांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, सीसीय खरेदी शनिवारपासून बंद केली. याचा फायदा व्यापारी घेणार. कापसाला अगोदरच भाव कमी आहे. आणखी भाव कमी झाले शेतकरी अडचणीत येईल. सरकारने लवकरात लवकर कापूस खरेदी सुरू करावी.
Nitin Gadkari to Vidarbha Farmers : कोल्हापूरला शक्य आहे, मग विदर्भाला का नाही?
‘कबर काढू कार सेवा करू’, यासंदर्भात विचारले असता, ही बाब सरकारने गांभीर्याने घ्यावी, असे ते म्हणाले. कायदा सुव्यवस्था बरोबर नाही. कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होईल आणि सीसीआय खरेदी थांबली, असे वक्तव्य बजरंग दलाने करणे दुर्दैवी बाब आहे. राज्य सरकारने यासाठी सकारात्मक पावलं उचलावी, असे अनिल देशमुख म्हणाले.
मुंडेंवर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टिकेसंदर्भात विचारले असता, त्या टिकेबद्दल मी ऐकलं आहे. बीडमध्ये जे प्रकार सुरू आहेत. त्यावर शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. सर्वत्र गुंडागर्दी सुरू आहे. शरद पवार यांनीही अश्या पद्धतीच्या गुंडागर्दीवर यापूर्वीही चिंता व्यक्त केली होती. पूर्वी अशी गुंडागर्दी नव्हती. सुप्रिया ताई म्हणतात की, एकाची विकेट जाणार. तर संजय राऊत म्हणतात सहा मंत्र्यांची विकेट जाणार, यात एकाची जाणार की सहा जणांची ते कळल्याचेही देशमुख म्हणाले.
Dr. Pankaj Bhoyar : आशा सेविकांनाही मिळणार टॅब, Technosavy करणार
कोरटकरला राज्य सरकारचे संरक्षण आहे, पोलीस असतांना, तो नागपुरातून फरार झाला. राज्य शासनानं जो से द्यायला पाहिजे होता, तो दिला नसल्यानं त्याला जामीन मिळाला. राज्य सरकारने त्याचा संरक्षण काढावं, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली.