22 Barbarians arrested, Anil Parabs sensational allegation : अनिल परबांचा खळबळजनक आरोप, 22 बारबाला पकडल्या !
Mumbai : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने सावली डान्सबार असल्याचा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केला आहे. विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी परब यांनी सांगितले की, गृहराज्यमंत्री कदम यांच्या आई ज्योती यांच्या नावाने कांदिवलीतील सावली डान्स बार आहे. पोलिसांनी या बारवर धाड टाकून 22 बारबाला ताब्यात घेतले आहे. डान्सबारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे?असा सवाल पण परब यांनी उपस्थित केला.
अंतिम आठवडा प्रस्तावावर परब यांनी विधानसभेत हा आरोप केला. ते म्हणाले की, कांदिवली येथे सावली बार आहे. इथे पोलिसांनी धाड टाकली, त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. 22 बारबाला 22 कस्टमर आणि 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला. या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला. त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. त्या गृह मंत्र्यांच्या मातोश्री आहेत.
Awhad Padalkar controversy : विधानसभा परिसरातील सामान्यांच्या प्रवेशाला बंदी येणार !
एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणीना डान्सबारमध्ये नाचवता? आजच्या आज गृह राज्यमंत्री यांचा राजीनामा घ्यावा. अजित दादा तुम्ही योग्य ती कारवाई कराल. मुख्यमंत्री आज कारभार सांभाळतात त्यांनी गृहराज्यमंत्री यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जर कारवाई झाली नाही तर सरकारचा या गोष्टीला पाठींबा आहे, हे सिद्ध होईल, असे देखील परब म्हणाले. तुमचा महाराष्ट्र बिहार झाला आहे का?
गृहराज्यमंत्र्यांकडून कायदे तुडवले जातं असतील तर मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रश्न आहे, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केलाय. परब म्हणाले की, आज आम्ही राज्यपालांकडे गेलो होतो. त्याठिकाणी आमच्या पीएला खाली उतरवलं? का उतरवलं तर म्हणाले की राज्यपाल यांच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. आता राज्यपाल सुरक्षित नसेल तर काय उपयोग? जनसुरक्षा विधेयक चाटायचं आहे का? काल विधीमंडळात मारामारी झाली, आमदार सुरक्षित नाहीत. असा आरोपही परब यांनी केला.
_______