Milk producers warn to stop selling milk : जनावरांच्या खाद्यपदार्थांचे भाव वाढले, दूध डेअरीपुढे आंदोलन
Buldhana चिखली तालुका व परिसरातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून, गाई-म्हशींच्या किंमतीसह जनावरांच्या खाद्यपदार्थांमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे आणि त्यामानाने दूध दरात कोणतीही वाढ न झाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर ५ ऑगस्ट रोजी चिखली येथील शासकीय दूध डेअरीसमोर दूध उत्पादक शेतकरी संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
शेतकरी संघाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी एका म्हशीची किंमत ६० ते ६५ हजार रुपये होती, ती आता ९० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर गाईची किंमत ५० ते ५५ हजार रुपयांवरून ८० ते ९० हजार रुपयांपर्यंत वाढली आहे.
Local Body Elections : महापालिका निवडणुकीचा शंखनाद; राजकीय हालचालींना वेग!
सध्या गाईच्या दूधाचा दर ₹४० प्रति लिटर आणि म्हशीच्या दूधाचा दर ₹५० प्रति लिटर आहे. मात्र सध्याच्या वाढलेल्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर हे दर अत्यंत कमी असल्यामुळे दूध विक्री शेतकऱ्यांना परवडत नाही, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांनी सरकारकडे गाईच्या दूधाला किमान ₹६० आणि म्हशीच्या दूधाला ₹८० प्रति लिटर दर देण्याची मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास १५ ऑगस्ट २०२५ पासून दूध विक्री बंद करण्याचा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघाने दिला आहे.
या आंदोलनात समाधान हागे पाटील, योगेश गोलांडे, रामू लोखंडे, लक्ष्मण अंभोरे, प्रशांत देशमुख, अनिकेत माने, रोहन टेकाळे, सुनील गोलांडे, सारंग नवले, शिवदास सावंत, सतीश गोलांडे, सचिन इंगळे, योगेश खरात, सागर जंजाळ, पंढरीनाथ सोळंकी, चेतन सोळंकी, संतोष शेळके, असलम हिरीवाले, गजानन टेकाळे, संतोष सुरडकर, सुखदेव सोनुने, सागर झाल्टे, अंकुश घुबे, अल्ताफ नूर, पंढरी सोळंकी, अभिषेक गोलांडे, दीपक सोमासे, कृष्णा देशमाने, ऋषिकेश सवडतकर, प्रकाश बनकर आदी शेतकरी उपस्थित होते.