Animal organ trafficking : घोड्याच्या पायाची चमत्कारी अंगठी घाला, भूतबाधा निघून जाईल

 

Horse painted black, claims to ward off evil spirits : भोंदूगिरी करणाऱ्या दोघांना अटक; पॉलिश केलेले काळे घोडे जप्त

Wardha गुप्तधन शोधण्यासाठी तस्करांकडून मांडूळ, खवले मांजरीच्या खरेदी – विक्रीच्या बुवाबाजीचा प्रकार चव्हाट्यावर आला. ३ रोजी रात्री पुन्हा काळ्या रंगाचे पॉलिश केलेले दोन घोडे पोलिसांनी जप्त केले. तसेच भोंदूगिरी करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणात शहाजाद अली नासिर अली २१, रा. शिलापूर दिल्ली, मनीष विजयशंकर यादव २२, रा. हमीरपूर उन्नाव, उत्तर प्रदेश, यांना अटक करून त्यांच्याविरूद्ध कलम (३) २ महाराष्ट्र नरबळी व इतर अमानूष अनिष्ट, अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करणेबाबत अधिनियम २०१३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur Police : जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला!

बजाज चौकात आरोपी दोन काळे घोडे आणि टांगा घेऊन बसले होते आणि ध्वनिक्षेपकावरून प्रसार करीत होते. अंनिसचे पदाधिकारी तेथून जात होते. त्यांना थांबवून तुम्हारे दुश्मनोंने आप के उपर काला जादू किया है, इस वजह से आपके कोई भी काम हो नहीं रहे, यातून सुटका पाहिजे असेल तर काळ्या घोड्याच्या पायाला लावलेली चमत्कारी नालपासून बनविलेली अंगठी घाला, तुमच्यावर असलेली भूत बाधा निघून जाईल, असे सांगितले.

अखेर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत अटक केली. घोड्यांना काळ्या रंगाचे पॉलिश करून नागरिकांची फसवणूक करत होते. बुवाबाजी करून त्यांना भीती दाखवून ५०० ते १,१०० रुपयांत अंगठीची विक्री करत होते. घोड्याला हात लावला असता काळा रंग लागल्याने ही बाब उजेडात आली. जप्त केलेले दोन्ही घोडे न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत करुणाश्रमात दाखल करण्यात आले आहेत.

Crime in Wardha : अट्टल घरफोडे सापडले, १५.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त

खवले मांजर प्रकरणात अटक असलेले आरोपी यांना न्यायालयाने वनकोठडी दिली होती. आता न्यायालयाने आरोपींची न्यायालयात रवानगी केली. इतर घाेड्यांना काळा रंग देऊन त्याची नाल चढ्या दरात विक्री केली जाते. नाल व अंगठ्यांच्या विक्रीतून पैसा मिळविता येतो. हा गैरसमज आहे.

यापासून दूर नेणारी नाल ही घोड्यांसाठी उपयोगी आहे. मानवांसाठी नाही, हे नागरिकांनी समजून घेत आपली फसवणूक थांबवावी. घोड्याच्या नालाविषयी विविध गैरसमज व अंधश्रद्धा समाजात आहे. याचा फायदा अशा टोळ्या घेत लुबाडणूक करतात.