Breaking

Anjali Damania : त्यांनी मागितली आणि एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी ‘ एसआयटी’ जाहीर केली?

Dhananjay Munde, who atrocities women, has no right to speak in this matter! : महिलांवर अत्याचार करणाऱ्या धनंजय मुंडेंना या प्रकरणात बोलण्याचा अधिकार नाही!

Mumbai : बीडमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी एसआयटी चौकशी सुरू झाली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा आरोप असून, अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या धनंजय मुंडेंना या प्रकरणात बोलण्याचा अधिकार नाही! असे म्हणत त्यांनी मुंडेंनी मागितली आणि एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी ‘ एसआयटी₹’ जाहीर कशी केली? असा सवाल करत या प्रकरणात मुंडेंचा हस्तक्षेप असल्याचे म्हटले आहे.
अंजली दमानिया यांनी नुकतंच समाज माध्यमावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हणले आहे की, ‘ इतकी मित्रता? मुंडेंनी मागितली आणि एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी एस आय टी जाहीर केली? आज दुपारी २ वाजता मी विधानपरिषदे च्या उपसभापती निलम गोऱ्हे यांचीn विधान भवनात येऊन भेट घेणार आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काही सवालही केले आहेत. धनंजय मुंडेंना यावर बोलण्याचा हक्क नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

Raj Thackeray : ‘ माझा ट्रेलर मी लाँच केला, पिक्चर अभी बाकी है’

काल धनंजय मुंडेंना बीड च्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारा संदर्भात भाश्य करताना बघून खूप राग आला. जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो, ज्याच्यावर महिला अत्याचाराच्या केसेस आहेत, त्याचे म्हणणे मुख्यमंत्री एका दिवसात ऐकून एका महिला आयपीएस ची एसआयटी लावतात? बीडच्या त्या अल्पवयीन मुलीला तातडीने न्याय मिळालाच पाहिजे, पण त्यासाठी लढायला चांगली सुसंस्कृत माणस आहेत. आम्ही नेहमी प्रमाणे लढूच. ह्यावर बोलण्याचा हक्क धनंजय मुंडेंना नक्कीच नाही. असेही दमानिया यांनी स्पष्ट केले आहे.

धान्य विक्री करणाऱ्यांची शिधापत्रिका होणार रद्द, खरेदीदारांवरही कारवाईचा इशारा

वैष्णवीच्या केस मधे मी तिच्या आईवडिलांना घेऊन वर्षा बंगल्यावर गेले, तेव्हा एक महिन्याने फ़ास्ट ट्रैक वर केस गेली. ही केस मुख्यमंत्र्यांनी का तत्काळ फ़ास्ट ट्रैक वर नेली नाही? सगळ्या महिला आमदारांनी ह्याचा विरोध करायला हवा. महिलांच्या सगळ्या प्रश्नांची दाखल ही तत्काळ घेतली गेली पाहिजे, पण ती मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून घ्यावी. धनंजय मुंडेंना मला वाटतं हा राजकारणाचाच एक भाग आहे.

Vikas thakare: विकास ठाकरेंची मागणी, पश्चिम नागपूरच्या झोपडपट्ट्यांचे पट्टे वाटप तत्काळ करा

बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी एसआयटी चौकशी केली जाणार आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी धनंजय मुंडेंनी याप्रकरणाची विशेष चौकशी समितीतर्फे केली जावी, अशी मागणी केली होती. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवला. आता याप्रकरणावरुन दमानिया यांनी टीका केली आहे.

___

 

 

 

 

___