Another result of MLA Mungantiwar’s efforts : मग्रारोहयो अंतर्गत कामावरील अकुशल मजुरांची थकीत मजुरी त्यांच्या खात्यात जमा
Chandrapur : चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामावरील अकुशल मजुरांच्या थकीत मजुरीची रक्कम मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील विविध गावांमधील मजुर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांवर अकुशल मजुर म्हणुन काम करित आहेत. शासनाकडून निधी प्राप्त न झाल्यामुळे त्यांना गेल्या दोन महिन्यांपासुन मजुरी मिळालेली नव्हती. त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या विधी क्षेत्राने मानले आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार
मजुरांनी या समस्येसंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली व आपली कैफियत मांडली. आमदार मुनगंटीवार यांनी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्याशी संपर्क साधला. देय असलेला निधी शासनाकडुन त्वरीत उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांना केली. यानंतर सातत्याने या कामाचा पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांच्या फलस्वरूप मजुरांच्या खात्यात त्यांच्या मजुरीचे पैसे जमा झाले आहे. यामुळे मजुरांत आनंदाचे वातावरण आहे.
Sudhir Mungantiwar : आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या ऐतिहासिक कार्याची पुन्हा होतेय आठवण !
राजकारणाबद्दल अनेकांच्या मनात नकारात्मक भावना असतात आणि अनेकजण त्या उघडपणे व्यक्तही करतात. मात्र, राजकारण केवळ निवडणुकांपुरते मर्यादित नाही. तर ते गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे माननारे नेते सुधीर मुनगंटीवार आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सदैव आग्रही असतात. त्यामुळे लोकांचे जीवन सुकर होण्यास मोठी मदत होते आहे.