Anti-corruption Bureau : हजेरी मस्टर तयार करण्यासाठी १२०० रुपयांची लाच!

 

Employment worker demanded a bribe of Rs. 1,200 : रोजगारसेवकाचा प्रताप; एसीबीने केली अटक

Gondia मजुरांचे हजेरी मस्टर तयार करून पाठविण्यासाठी एक हजार २०० रुपयांची लाच मागणाऱ्या रोजगारसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रावणवाडी पोलिस ठाण्यांंतर्गत ग्राम झिलमिली येथे ही कारवाई करण्यात आली. खुमेश भोजराज वघारे (२७, ग्रामपंचायत झिलमिली) असे लाचखोर रोजगारसेवकाचे नाव आहे.

तक्रारदार (५७,रा. सिंदीटोला) हे शेतमजूर असून त्यांना सन २०२४ मधे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये पहिला हप्ता १५ हजार रुपये व २२ फेब्रुवारी २०२५ रोजी दुसरा हप्ता ७० हजार रुपयांचा तक्रारदारांच्या पोस्टामधील खात्यात जमा झाला आहे. त्यानंतर तक्रारदारांनी रोजगार सेवक खुमेश वघारे याला घरकुल बांधकामाचे काम करणाऱ्या मजुरांची हजेरी (मस्टर) तयार करून पाठवण्याची विनंती केली.

Animal organ trafficking : घोड्याच्या पायाची चमत्कारी अंगठी घाला, भूतबाधा निघून जाईल

यावर वघारे याने मस्टर तयार करून पाठवून देण्यासाठी एक हजार ६०० रुपयांची मागणी केली. यावर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पथकाने पडताळणी केली असता वघारे याने तडजोडीअंती पंचासमक्ष एक हजार २०० रुपयांची लाचेची मागणी केली. दरम्यान, पथकाने सापळा लावून वघारे याला त्याच्या घरीच तक्रारदाराकडून एक हजार २०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

Education Department : SQAAF मूल्यांकनाने शिक्षक हैराण!

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक विलास काळे, पोलिस निरीक्षक राजीव कर्मलवार, स. फौ. चंद्रकांत करपे, हवालदार संजय बोहरे, मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनेवाने, कैलास काटकर, महिला शिपाई संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक शिपाई अल्फाज शेख यांनी पार पाडली.