Breaking

Anup Dhotre : अकोल्यात लवकरच धावणार ५० ई-बसेस!

50 e-buses will soon run in Akola : खासदारांकडून खडकीतील चार्जिंग सेंटरची पाहणी

Akola अकोल्यात लवकरच ५० ई-बस सेवा सुरू होणार आहे. खासदार अनुप धोत्रे यांनी अलीकडेच खडकी येथे उभारण्यात येत असलेल्या बॅटरी चार्जिंग सेंटरच्या कामाची पाहणी केली. विशेष म्हणजे ई-बसेसमुळे अकोल्यातील प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यात मोठे यश येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी देशभरातील १९ शहरांमध्ये ई-बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी केंद्र सरकारने १९० कोटी रुपये वितरित केले असून, त्याअंतर्गत अकोल्यासाठीही विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे.

Bacchu kadu, Ravi Rana : लठधारी आमदार ‘पोस्टर’द्वारे बच्चू कडूंना डिचवले!

खडकी येथे तीन एकर जागेत भव्य बॅटरी चार्जिंग सबस्टेशन उभारले जात असून, यासाठी संपूर्ण निधी केंद्र सरकारकडून दिला जात आहे. ही इमारत केंद्र व राज्य सरकार तसेच अकोला महानगरपालिकेच्या सहकार्याने उभारली जात आहे. एकूण १९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यासाठी मनपा आयुक्त सुनील लहाने यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ७ कोटींची तरतूद केली आहे.

बस सेवा तपशील :
१२ किमी अंतरासाठी : १४ बसेस
९ किमी अंतरासाठी : २८ बसेस
७ किमी अंतरासाठी : ८ बसेस

या बससेवा अकोला शहरातील विविध भागांसह आजूबाजूच्या गावांना जोडणार आहेत. या सेवेमुळे इंधन बचत, पर्यावरण रक्षण आणि सामान्य नागरिकांना कमी दरात प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्र व राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करताना विविध अडचणी जाणून घेतल्या. वीज वितरण कंपनी व इतर संबंधित विभागांशी समन्वय साधत काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. माजी महापौर व भाजप नेते विजय अग्रवाल, आयुक्त सुनील लहाने, अभियंता हांडे आणि अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही पाहणी झाली.

Digital India : मानधनाविना हतबल; संगणक परिचालकांचा कामबंद एल्गार

या चार्जिंग प्रकल्पाचे काम मॅजेस्टिक असोसिएट्स कडून सुरू आहे. २० टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत बस सेवा सुरू करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये विजय अग्रवाल, जयंत मसने, कार्यकारी अभियंता अजय गुजर, अभियंता अमोल डोईफोडे, चेतन शंकर पुरे, अमोल गावंडे, नकुल पागृत यांचा समावेश होता.