Breaking

Anup Dhotre, Randhir Sawarkar : वाजतगाजत निघाली नेत्यांची मिरवणूक!

Citizens expressed gratitude to the leaders for development works : विकासकामांमुळे आनंदी गावकऱ्यांचा उत्साह;

Akola सहसा विकासकामे रखडल्यामुळे किंवा कामं होतच नसल्यामुळे नेत्यांवर नाराजी व्यक्त होते. पण अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकासकामांवर खुश असलेल्या गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे नेत्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली.

आमदार रणधीर सावरकर यांच्या विशेष निधीतून लाखोंडा खुर्द येथे को. प. बंधारा बांधकामाचे लोकार्पण झाले. तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजने (टप्पा २) अंतर्गत म्हातोडी-लाखोंडा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी गावकऱ्यांतर्फे झालेल्या सत्काराबद्दल आमदार रणधीर सावरकर यांनी आभार मानले. तसेच, ग्रामीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिले.

Chandrashekhar Bawankule : सिंचन आणि पुनर्वसनाची कामे Pending ठेवू नका!

खासदार अनुप धोत्रे म्हणाले, ‘ग्रामीण भागाचा विकास करण्यास काँग्रेस अपयशी ठरले. नागरिकांना शिक्षण व मूलभूत सोयीसाठी शहरांकडे स्थलांतर करावे लागले. गेल्या पन्नास वर्षांत काँग्रेसने दळणवळण आणि कृषी उत्पादन वाढवण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामीण जीवन अडचणीत आले. मात्र, महायुती सरकारने दळणवळण सुविधा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजना राबवून विकासाला गती दिली.’

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार रणधीर सावरकर यांनी नियोजनबद्ध विकास करत जनतेचा विश्वास संपादन केला. आरोग्य आणि कृषी उत्पादन वाढवण्यासाठी विविध योजनांना गती दिली. त्यामुळे पंतप्रधान विकासाला चालना मिळाली, असंही धोत्रे म्हणाले.

ACB Amravati : पोलीस शिपायानेच घेतली लाच!

कार्यक्रमास राजेश बेले, अनिल गावंडे, दिनुभाऊ ओळंबे, भरत काळमेघ, वैभव तराळे, शरद तराळे, श्रीकृष्ण झटाले, बाबुलालजी कांगटे, चंदू खडसे, भालचंद्र पागृत, घावटभाऊ, तसेच मृद व जलसंधारण विभागाचे वानरे आणि विनय भटकर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर गावातून दोन्ही नेत्यांची मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी विविध ठिकाणी रांगोळी काढून त्यांचे स्वागत व आशीर्वाद दिले.