APMC : अचलपूर बाजार समितीतील कोटींचा घोटाळा उघडकीस

Scam worth crores in Achalpur Market Committee exposed : प्रशासकासह ७ कर्मचाऱ्यांवर ९२ लाखांची जबाबदारी

Amravati जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ समजली जाणारी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या कोट्यवधींच्या घोटाळ्यामुळे चर्चेत आली आहे. सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षांतील ऑडिट अहवालात ९२ लाख ४० हजार १५२ रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले असून, या रकमेच्या वसुलीसाठी समितीने सात कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे.

या आरोपितांमध्ये तत्कालीन प्रशासक एस. टी. केदार, प्रभारी सचिव अमर वानखडे, लेखापाल जनार्दन गुळधे, संगणक लिपिक योगेश चव्हाण, मनोज ठाकरे आणि इतर दोन कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यापैकी तिघांवर सर्वाधिक ८७ लाख ९ हजार ४०० रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचे मंत्रिमंडळात कमबॅक होणार?

घोटाळ्यातील जबाबदारीचे तपशील:

अमर वानखडे – ₹१०,०४,१८४
जनार्दन गुळधे – ₹२,१२,१०३
योगेश चव्हाण – ₹२७,८१५
मनोज ठाकरे व गुळधे – ₹२०,१७५
इतर कर्मचारी – ₹१२,९४८

शासकीय ऑडिटर गवळे यांनी ‘वसूलपात्र रकमेचा गोषवारा’ या मथळ्याखाली सर्व तपशील नोंदवले आहेत.

सभेत घोटाळ्याची मांडणी, वसुलीसाठी आवाहन

नुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत हा घोटाळा अधिकृतपणे मांडण्यात आला. यावेळी सभापती, उपसभापती आणि संचालकांनी सविस्तर चर्चा करत दोषींवर कारवाईची मागणी केली.

संचालक राजेंद्र गोरले म्हणाले, “माझ्या कार्यकाळात ऑडिट प्रक्रिया पारदर्शक झाली. दोषींवर कायदेशीर कारवाईत विलंब होता कामा नये. भविष्यात अशा भ्रष्टाचारास आळा बसावा यासाठी वसुली आवश्यक आहे.”

सेवक उपसमिती प्रमुख वर्षा आवारे म्हणाल्या, “घोटाळा फौजदारी स्वरूपाचा आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई आवश्यक असून, कायदेशीर प्रक्रिया त्वरीत राबवली पाहिजे.”

Tribal Pardhi Society : आदिवासी पारधी समाजाला हवे उच्चपदस्थांचे पाठबळ !

शेतकऱ्यांच्या विश्‍वासाला तडा
बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हक्काचे संस्थान असताना, संबंधित अधिकाऱ्यांनी या संस्थेच्या माध्यमातून स्वहित साधल्याचा आरोप या प्रकरणातून स्पष्ट झाला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेली संस्था भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या हातात गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या प्रकरणात संबंधितांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पुढील कारवाई कायदेशीर चौकटीत केली जाणार असल्याचे समिती प्रशासनाने स्पष्ट केले आहे.