Breaking

Appointments of BJP District Presidents : संघटनमंत्र्यांचा दबदबा कायम राहणार ?

Appointments of four district chairmen delayed : प्रदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी काही जिल्ह्यांच्या नियुक्त्या थांबवल्या

Nagpur : भारतीय जनता पक्ष निवडणुका घेऊन बुथ पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यासाठी प्रक्रिया राबवतो. ही यंत्रणा अतिशय सक्षम असते. शिस्तीचा पक्का म्हणून हा पक्ष ओळखला जातो. महाराष्ट्र प्रदेशच्या संघटनेचा तिसरा टप्पा हा जिल्हाध्यक्षांच्या निवडीचा होता आणि काल भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयानंतर ५८ जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहिर केल्या.

महाराष्ट्रात भाजपने संघटन पर्व जोरदार चालवले. बुथअध्यक्षांची निवड करण्यासाठी निवडणूक अधिकारी नियुक्त केले गेले होते. यानंतर मंडळ अध्यक्षांसाठीही तशीच सक्षम यंत्रणा राबवली गेली. राज्यातील सर्व जिल्ह्यांत पक्ष संघटन वाढवण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया राबवली गेली. पण ही प्रक्रिया राबवताना विदर्भ – मराठवाड्यातील काही जिल्हांमध्ये स्थानिकांचा विरोध झाला. अन् येथेच भाजपच्या पक्षशिस्तीला तडा गेला. परिणामी काही निवडी लांबणीवर पडल्या.

Vanchit bahujam aghadi : शरद पवारांना भीमा कोरेगाव प्रकरणात रस उरलेला नाही का?

अजूनही विदर्भाच्या काही जिल्ह्यांतील अध्यक्षांच्या निवडी व्हायच्या आहेत. मराठवाड्याचा विचार केला तर छत्रपती संभाजी नगर शहर, बीड, लातूर शहर, लातूर ग्रामीण, परभणी ग्रामीण, नांदेड दक्षिण ग्रामीण, नांदेड उत्तर ग्रामीण या जिल्ह्यांच्या निवडी अद्याप झालेल्या नाहीत. संघटनमंत्र्यांचे निकटवर्तीय समर्थक या जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष पदाचे दावेदार होते, अशा चर्चा झडल्या.

Disaster Management : युवकांनो..! सिव्हिल डिफेन्स वॉरिअर व्हा !

प्रदेश पातळीवरील निवडणूक अधिकाऱ्यांनी मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील निवडी घोषीत न केल्यामुळे संघटन मंत्र्यांचा दबदबा पुढे कायम राहिल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोबत संघटना सारासार विचार करून संघ परिवाराच्या प्रमुखांशी संवाद साधून निवडी करणार का, हे येत्या काळात पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

  • अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी)

    अमरावती विद्यापीठातून पत्रकारीतेची पदवी. २६ वर्षांपासून पत्रकारीतेमध्ये कार्यरत. सन २००० पासून लोकमत आणि सकाळ वृत्तपत्र समुहामध्ये विविध पदांवर कार्य केलेले आहे. दैनिक सकाळच्या सरकारनामा या वेब पोर्टलसाठी राजकीय प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.