Breaking

Artificial Intellengence in health sector : AI मशीनने काढले ६८ हजार ६२६ ECG!

AI-based ECG machine takes report in three minutes : चार वर्षांमध्ये घडली कमाल; तीन मिनिटांत रिपोर्ट हाती

Wardha हृदयरोगाशी संबंधित रुग्णांना ईसीजी अहवाल महत्त्वाचा ठरतो. तो वेळेत मिळाला, तर उपचारात मोठी मदत होते. त्यामुळे शासनाने ‘स्टेमी’ STEMI प्रकल्पांतर्गत शासकीय रुग्णालयांना एआय आधारित ईसीजी मशिनचे वाटप केले आहे. वर्धा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये या एआय आधारित ईसीजी मशिनचा वापर अनेक रुग्णांसाठी वरदान ठरला आहे. या मशिनद्वारे ईसीजी काढण्यासाठी केवळ तीन मिनिटांचा वेळ लागत आहे.

जिल्ह्यातील रुग्णालयांना जानेवारी २०२१ मध्ये एआय आधारित ईसीजी मशिनचे वाटप करण्यात आले होते. त्यासाठी एक ॲप बनविण्यात आले आहे. संबंधित रुग्णाच्या ईसीजीची माहिती अवघ्या तीन मिनिटांमध्ये संबंधित विशेषज्ज्ञ अथवा हृदयविकार तज्ज्ञांना मिळते. माहिती तत्काळ मिळाल्यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर तत्काळ उपचार करणे शक्य होत आहे.

Shivbhojan : आघाडी सरकारची ही योजना आजही ठरतेय कष्टकऱ्यांसाठी वरदान!

हृदयाशी संबंधित आजारासाठी एआय आधारित ईसीजी मशीन उपयुक्त आहे. जिल्हा रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये देखील या मशिन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या आजाराचे निदान होते आणि त्यांना पुढील उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत करार झालेल्या खासगी रुग्णालयांमध्ये घेता येतो. या मशीनच्या माध्यमातून मागील चार वर्षात ६८ हजार ६२६ ईसीजी काढण्यात आले आहेत.

Ajit Pawar NCP : गडचिरोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का!

चार वर्षांत वर्धा शहरातून नागपूर येथील लता मंगेशकर रुग्णालयात रेफर केलेल्या रुग्णांपैकी २७ रुग्णांची अँजिओग्राफी, तर २० रुग्णांची अँजिओग्राफी महात्मा फुले योजनेंतर्गत करण्यात आली आहे. हृदयविकाराशी संबंधित रुग्णांनी एआय आधारित ईसीजी तंत्रज्ञानाचा नागरिकांनी फायदा घ्यावा. हृदयविकारासंबंधित सर्व आरोग्य संस्थेत मोफत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.