Marathi Writer Against Hindi Language Compulsion : हिंदी भाषा सक्तीवरुन लेखकाची सरकारला जोरदार चपराक
Mumbai : महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडे वादविवाद पाहायला मिळत आहे. भाषेवरून राजकारण चांगलंच दिसून येत आहे. बरेच जण सरकारवर टीका करत आहेत. यामध्ये केवळ सर्वसामान्यांचा समावेश नसून बऱ्याच सेलिब्रिटी मंडळींचा देखील समावेश पाहायला मिळत आहे. आतापर्यंत सचिन गोस्वामी, हेमंत ढोमे , समीर चौगुले यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हिंदी भाषा सक्तीकरणावर निषेध केला आहे. आता लेखक अरविंद जगताप यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आहे. त्यांनी आपल्या पोस्ट मधून सरकारवर टीकास्त्र सोडले.
राज्यातल्या शाळांमध्ये पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकण्यी सक्ती केल्यापासून राज्यात वातावरण तापलं आहे. अनेकांनी सरकारच्या या निर्णयाला चांगलाच विरोध दर्शवला आहे अरविंद जगताप हे चला हवा येऊ द्या मधल्या पोस्टमन या पात्रामार्फत पाठवल्या जाणाऱ्या पत्राच्या लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लिखाणामुळे बरेचदा त्यांचे कौतुक होते. आता अरविंद जगताप यांनी सरकारची कान उघडणी करण्यासाठी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, पहिलीतल्या वीस मुलांनी एकत्र यायचं आणि तिसरी वेगळी भाषा निवडायची. मग हे सरकार शिक्षक देणार. म्हणजे पक्ष फोडायचा अन आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच शिकायचं म्हणा ना! सध्या जगताप यांची ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.
Amruta fadanvis : योगदिनी अमृता फडणवीस म्हणाल्या देवेंद्रजी ‘योगी’च
हिंदी भाषा सक्तीकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा कडाडून विरोध दर्शवला. ते सतत वेगवेगळ्या भाषण आणि सोशल मीडिया पोस्ट मधून हिंदी भाषेला विरोध दर्शवत आहेत. गुजरात मध्ये सुद्धा तिसरी भाषा पर्याय म्हणून हिंदीला स्थान नाही मग महाराष्ट्रातच का असा सवाल त्यांनी उठवला आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने जीआर काढले होते ज्यामध्ये राज्यातल्या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला गेला. तसेच हिंदी भाषा व्यतिरिक्त दुसरी भाषा शिकायची असेल तर त्यासाठी वीस पेक्षा जास्त विद्यार्थी हवेत. अन्यथा तिसरी भाषा म्हणून हिंदीच भाषा शिकावी लागेल असं त्या जीआर मध्ये स्पष्ट केलेले.