Arvind Sawant : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठाकरे सेना रस्त्यावर!

 

Shiv Sena Thackeray group to take out tractor march for farmers’ loan waiver : ट्रॅक्टर मोर्चा काढणार; खासदार अरविंद सावंत यांची अमरावतीत घोषणा

Amravati शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने निवडणूकपूर्व दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्याने २ मे रोजी विदर्भातील सहा जिल्ह्यात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेनेचे खासदार व नेते अरविंद सावंत यांनी मंगळवारी केली.

शहरातील सांस्कृतिक भवन येथे शिवसेनेच्या पश्चिम विदर्भ विभागातर्फे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहून कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारविरोधात एकजूट दाखवली. मेळाव्याचे आयोजन जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

या वेळी खासदार संजय देशमुख, आमदार नितीन देशमुख, माजी खासदार अनंत गुढे, उपनेते सुधीर सूर्यवंशी, गजानन लवटे, सिद्धार्थ खरात, संजय दरेकर, संपर्क प्रमुख दिलीप जाधव (वाशिम), प्रकाश शिरवाळकर (अकोला), राजेंद्र गायकवाड (यवतमाळ), रमेश जाधव (वर्धा), नरेंद्र खेडेकर (बुलढाणा), अभिजीत ढेपे (अमरावती), भैयासाहेब नर्मळ, माजी आमदार प्रदीप वडनेरे, आसावरी देशमुख, प्रतिभा बोपशेट्टी, मनोज कडू, नरेंद्र पडोळे, सुरेश मापारी, किशोर इंगळे, प्रवीण शिंदे, राजेश खुपसरे, आशिष पांडे, गोपाल दातकर, मंगेश काळे, जालिंदर बुधवंत, वसंतराव भोजने आदी मान्यवर उपस्थित होते.

Arvind Sawant: खासदार अरविंद सावंत यांच्या पुतळ्याचे दहन

मेळाव्यात खासदार अरविंद सावंत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. सावंत यांनी मोदी सरकारच्या अपयशांची यादी मांडली. १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन, कर्जमाफी, महागाई नियंत्रण आणि महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले.

मेळाव्यात आमदार नितीन बापू देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांना भगव्याच्या आत दडलेले सैतान असे संबोधले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सावंत यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची टीका केली. सरकार राज्यांमधील सत्तापालट करण्यात अधिक रस घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. अयोध्येतील निवडणुकीत भाजपला अपयश आल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

Maharashtrta Government : गतिमान, पारदर्शक कारभाराकरिता सरसावले प्रशासन !

सावंत पुढे म्हणाले, “राज्य सरकारने अनेकदा शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासने दिली. मात्र अद्याप कृतीशून्य अवस्था आहे. त्यामुळे आता रस्त्यावर उतरून सरकारला जागं करण्याची वेळ आली आहे.”

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कृती करणार आहे. पक्षाने २ मे रोजी विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी अमरावतीत झालेल्या विभागीय निर्धार मेळाव्यात या मोर्चाची घोषणा केली. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हा मोर्चा निघणार आहे. मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. पक्षाने पाच हजार गावांमध्ये निर्धार सभा घेण्याचे नियोजन केले आहे.