Breaking

Ashadhi Ekadashi 2025 : अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर ||

Ashadhi enthusiasm across state, huge crowd of devotees for Vithu Darshan :राज्यभर आषाढीचा उत्साह, विठू दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

Pandharpur: आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाच्या चरणी अपार श्रद्धा ठेवून सर्व दु:ख, चिंता दूर होवोत अशी अपेक्षा ठेवत पंढरपूरमध्ये लाखो वारकरी आणि भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. आषाढी एकादशीचा उत्साह राज्यभर दिसत असून, ठिकठिकाणी मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. विठुरायाच्या भजनांनी भक्त आणि वारकऱ्यांनी भक्तिमय वातावरण तयार केले आहे सर्वत्र विठ्ठलाचा जयघोष पहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे पंढरपूरच्या विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली. प्रतिपंढरपूर मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या राज्यातील विविध भागातील मंदिरातही उत्साह पाहायला मिळत आहे. ‘ विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल’… अशा जयघोषात आणि विठू नामाचा गजर राज्यभरात ओसंडून वाहत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात असेच उत्साही आणि भक्तिमय वातावरण दिसत आहे. विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच राज्यभरातून सुमारे १८ ते २० लाख वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.

Eknath Shinde : राज यांच्या भाषणात तळमळ पण उद्धवच्या भाषणात मळमळ दिसली !

चंद्रभागेच्या तीरावर आणि पंढरपूर मार्गांवर अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आषाढी एकादशीची शासकीय महापूजा झाली. राज्याची भरभराट व्हावी आणि शेतकरी सुखी व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलचरणी विशेष प्रार्थना केली. मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास ही पारंपरिक पूजा पार पडली. या वेळी विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी आणलेला खास पोशाख विठ्ठलाला परिधान करून, विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची आरतीही करण्यात आली.

या वर्षीच्या शासकीय पूजेचा मान सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पिंप्रद येथील शेतकरी दांपत्य बाळासाहेब पाटील आणि श्रीमती शोभा पाटील यांना मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असतानाही सर्वसामान्य भाविकांसाठी मुखदर्शनाची रांग सुरू ठेवण्यात आली, तर व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला.

Sudhir Mungantiwar : खत पुरवणाऱ्या या कंपनीला शिक्षेचं खत दिल्याशिवाय त्यांची मस्ती उतरणार नाही !

विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांनी तसेच विद्युत रोषणाईने सजवण्यात आले. नामदेव पायरीलाही सुंदर फुलांची सजावट करण्यात आली.तर दुसरीकडे मुंबईतील वडाळ्यात असलेल्या प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिरातही रात्रीपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वडाळ्यातील प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिरातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पुजा केली.