Breaking

Ashish Deshmukh : नागपूर जिल्ह्यात होणार फर्टीलायझर कॉम्प्लेक्स !

MLA Dr. Ashish Deshmukh met Chief Minister Devendra Fadnavis : शेतकऱ्यांची प्रगती व मोठ्या रोजगार निर्मितीसाठी आमदार डॉ. देशमुख यांचे प्रयत्न

Nagpur : नागपूर जिल्ह्यात फर्टिलायझर काँप्लेक्स स्थापन करण्याच्या अनुषंगाने सावनेर-कळमेश्वर मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची 10 एप्रिलला मुंबई येथे भेट घेतली. या भेटीतील बैठकीत त्यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

मुख्य म्हणजे, ओडिशा राज्यापर्यंत जाणारी नैसर्गिक वायूची पाईपलाईन नागपूरहून जाते. या पाईपलाईनच्या माध्यमातून होणाऱ्या गॅसच्या पुरवठ्याच्या आधारे आपण नागपूर जिल्ह्यात केमिकल रिफायनरी कॉप्लेक्स स्थापन करू शकतो, हा विषय डॉ. देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या यापूर्वीच्या भेटीतदेखील चर्चेत घेतला होता.

Sudhir Mungantiwar : पांढरकवड्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक विकास अधिक वेगाने होईल !

कळमेश्वर येथे भारतातील सर्वात मोठा खतांचा कारखाना, इंटिग्रेटेड फर्टीलायझर कॉम्प्लेक्स यावा, यासाठी आमदार डॉ. देशमुख हे प्रयत्नरत आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनीसुद्धा आमदार डॉ. देशमुख यांना याबद्दल मदत करण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकल्पामध्ये युरिया आणि शेतीसाठी लागणारे अन्य पदार्थ निर्माण करू शकतो. जेणेकरून शेतकऱ्यांना वाजवी दरात या गोष्टी मिळतील आणि शेतकऱ्याचा पैसा वाचून आर्थिक लुबाडणुक होणार नाही, असे डॉ. देशमुख म्हणाले.

अशा प्रकारचा प्रकल्प नागपूर जिल्ह्यात उभारला गेल्यास त्याचे दोन फायदे होतील. पहिला म्हणजे प्रादेशिक अर्थकारणाला बळ मिळेल आणि शेतीचे उत्पन्न वाढेल. याशिवाय मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील. फर्टिलायझर काँप्लेक्ससारखा महाकाय प्रकल्प स्थापन झाल्यास त्याच्या भोवताली इतर उद्योगही येतील आणि गुंतवणूकही वाढेल. नागपूर जिल्ह्याला कृषी आणि औद्योगिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे.

ग्रामीण भागात आत्मनिर्भरता आणि आर्थिक विकासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. शेतकऱ्याचे महागड्या खतांवरील अवलंबित्व कमी झाल्याने ते लाभान्वित होतील. गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लि. अर्थात ‘गेल’ने अशा प्रकारच्या प्रकल्पात स्वारस्य दाखविले आहे. आपल्या माध्यमातून विदर्भ तसेच नागपूर जिल्ह्याच्या विकासाचे चक्र अधिक गतिमान व्हावे तसेच शेतकऱ्यांची प्रगती आणि मोठी रोजगार निर्मिती व्हावी, या हेतुने या महत्वाच्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक पावले तातडीने उचलावीत, असेही डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे.

Chandrashekhar Bawankule : उमरेड एमआयडीसीतील अपघात: मृत व्यक्तींच्या कुटुंबास ६० लाखांची मदत

या प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक पावले लवकरच उचलण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यासाठी आवश्यक सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. राजीव सिंघल (डायरेक्टर, बिडी), प्रवीण कुमार श्रीवास्तव (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर), आनंद कापरे (जनरल मॅनेजर, गेल), डॉ पी अंबालागन (सेक्रेटरी, इंडस्ट्रीज) हे यावेळी उपस्थित होते. या विषयाशी संबंधित एक निवेदनसुद्धा मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.