Breaking

Ashish Jaiswal, D. M. Reddy : आशिष जयस्वालांपुढे पुन्हा रेड्डींचे आव्हान!

Who will win Ramtek Municipal council election? : रामटेक नगर परिषद निवडणुकीत महायुतीपुढे निर्माण होणार पेच

Nagpur रामटेक नगर परिषदेची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेस एकमेव दावेदार आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत नाराज असलेले रेड्डी आता स्थानिक निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळाव्या यासाठी आग्रही असणार आहेत. त्यामुळे रामटेकच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यापुढे पुन्हा एकदा माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांचे आव्हान उभे आहे.

विधानसभा निवडणुकीत रामटेकची जागा शिवसेनेकडे गेल्याने रेड्डी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी जाहीर केली. त्यांनी भाजपमधील काही नेत्यांच्या नावांचाही उल्लेख केला होता. त्यामुळे रेड्डी यांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा ते पक्षात सक्रीय झाले आहेत.

Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule : प्रजासत्ताकदिनी राजपथावर हवा श्रीक्षेत्र रिद्धपूरचा चित्ररथ

रामटेक येथेही तब्बल आठ वर्षांनी निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. विधानसभा निवडणुकीतील दमदार यशानंतर रामटेकमध्ये महायुतीची ताकद वाढली आहे. त्यामुळे रामटेक नगरपरिषदेवर यावेळी महायुतीचा झेंडा फडकणार की काँग्रेस मुसंडी मारणार याची चर्चा सुरू झाली आहे.

सध्या शिवसेना, भाजप व काँग्रेस कार्यकर्ते मोर्चे बांधणी करायला लागले आहेत. फक्त प्रतीक्षा आहे ती आरक्षण जाहीर होण्याची. रामटेक नगरपरिषदेची निवडणूक ८ जानेवारी २०१७ मध्ये झाली होती. तेव्हा रेड्डी यांच्या नेतृत्वात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. तर जयस्वाल यांना दोन सदस्यांवर समाधान मानावे लागले. १७ पैकी १३ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. नगराध्यक्ष पदाची जागाही भाजपने जिंकली होती.

नगराध्यक्षपदी दिलीप देशमुख, तर नगरसेवकपदी आलोक मानकर, कविता मुलमुले, प्रभाकर खेडकर, शिल्पा रणदिवे, संजय बिसमोगरे, प्रवीण मानापुरे, रामानंद अडामे, चित्रा धुरई, अनिता टेटेवार, उज्ज्वला धमगाये, लता कामडे, रत्नमाला अहिरकर, पद्मा ठेंगरे हे विजयी झाले होते. काँग्रेसचे दामोदर धोपटे व यादव जांभुळकर, तर शिवसेनेचे सुमित कोठारी व सुरेखा माकडे हे विजयी झाले होते.

रामटेकमध्ये महायुती व काँग्रेसमध्ये सामना रंगणार आहे. पण, महायुतीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत भाजपची सत्ता होती. त्यामुळे त्यांचा जास्त जागेचा दावा राहील. सध्या शिवसेनेचे आमदार आशीष जयस्वाल हे मंत्री आहेत. यामुळे शिवसेना येथे ताकदीने निवडणूक लढणार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे. त्यामुळे ते जास्तीत जास्त जागा मागतील. त्यामुळे हा तिढा कसा सुटेल हे बघावे लागेल. रेड्डी हे यावेळीसुद्धा भाजपचे नेतृत्व करतील, हे जवळपास स्पष्ट आहे.

Election Commission : ओबीसी उमेदवाराला निवडणूक खर्चाच्या १० पट मोबदला द्यावा

गेल्या काळात दामोदर धोपटे यांनी विविध प्रश्नांवर आंदोलन करीत आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे यावेळी काँग्रेस जोमाने निवडणूक लढण्याची शक्यता आहे. सध्या निवडणुकीबाबत प्रशासनाकडून कुठलेही आदेश आले नाहीत; पण निवडणुकीच्या चर्चा मात्र सगळीकडे सुरू झाल्या आहेत.