Sudhir Mungantiwar’s work in the cabinet praised by Ashok Chavhan : नांदेडमधील कार्यक्रमाच्या भाषणाची होतेय चर्चा
Nanded नांदेड येथे आर्य वैश्य समाजाची महासभा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. भाषण करताना त्यांनी ‘सुधीरभाऊ तुम्हाला सलाम करतो’ असे म्हटले. मुनगंटीवार यांनी राज्याच्या विकासात दिलेल्या योगदानाविषयी ते बोलत होते.
राज्याच्या तिजोरीच्या चाव्या मुख्यमंत्र्यांपेक्षाही अधिक अर्थमंत्र्यांच्या हाती असतात. अशावेळी ती तिजोरी सांभाळून वापरण्याची, व्यवस्थितपणे हाताळण्याची आणि प्रत्येक पैशाचा हिशेब जनतेला द्यावा लागणार आहे, याची जाणीव ठेवून सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासन हाताळले. त्यासाठी सुधीरभाऊ तुम्हाला सलाम करतो,’ असं अशोक चव्हाण म्हणाले.
PM Narendra Modi Dream Project : नागपूर जिल्ह्यात ७५ हजारावर ‘लखपती दिदी’!
सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा महाराष्ट्राच्या इतिहासात नेहमी गौरवाने उल्लेख केला जाईल. अशा पद्धतीने त्यांनी फार काळजीपूर्वक तिजोरी हाताळली आणि समाजाला न्याय दिला. फक्त आर्य वैश्य समाजालाच नव्हे तर राज्यातील विविध घटकांना न्याय देण्याचे काम सुधीरभाऊंच्या कारकिर्दीत झाले आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले.
‘सुधीरभाऊ तुम्ही पुन्हा जोरदार बॅटिंग करणार’
आयपीएलमध्ये खेळाडूंना काही दिवस विश्रांती करावी लागते. तसाच हा तुमच्यासाठी विश्रांतीचा काळ आहे. आयपीएलमध्ये विराट कोहली चांगला खेळल्यानंतर त्याला थोडा ब्रेक दिला जातो. त्याचा थोडा आराम व्हावा आणि पुन्हा उठून जोरदार बॅटिंग करावी, यासाठी ही विश्रांती असते. तुमचा विश्रांतीचा काळ लवकरच संपेल. आणि महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात जोरदार बॅटिंग करण्यासाठी तुम्ही तयार असाल, अशा शुभेच्छाही अशोक चव्हाण यांनी मुनगंटीवार यांना दिल्या.
Dr. Pankaj Bhoyar : अनाथ, दिव्यांगांसोबत पालकमंत्र्यांचा एक दिवस!
तुम्ही कुणालाही दुखावणार नाही
सुधीर मुनगंटीवार यांचे राज्याच्या विकासातील योगदान तसेच राजकीय प्रवासाबद्दल अशोक चव्हाण यांनी भाष्य केले. पण त्याचवेळी त्यांनी मुनगंटीवार यांच्या स्वभावातील गुणांचाही उल्लेख केला. ‘महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात जोरदार बॅटिंग करण्यासाठी तुम्ही तयार आहात. आम्हा सर्व मित्रांच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत. तुम्ही कधीही कुणाला दुखावणार नाही. आजपर्यंत चांगले काम करत आहात आणि उद्याही करत राहाल याचा मला विश्वास आहे,’ असं अशोक चव्हाण म्हणाले.