व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Ashok kharat case : ‘व्हीआयपी दरबार’चा पर्दाफाश; अशोक खरात ‘स्पॉट व्हिजिट’साठी ५...

Ashok kharat case : ‘व्हीआयपी दरबार’चा पर्दाफाश; अशोक खरात ‘स्पॉट व्हिजिट’साठी ५ लाख आकारायचा !

ashok-kharat-nashik-fake-baba-vip-darbar-exposed-spot-visit-fee-fraud-case-2026 : भक्तांच्या श्रद्धेवर कोट्यवधींचा डल्ला, रोज नवे कारनामे उघड

Nashik : भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याच्या तथाकथित ‘व्हीआयपी दरबार’मागील आर्थिक साम्राज्याचे धक्कादायक तपशील समोर येऊ लागले आहेत. एसआयटीमार्फत सुरू असलेल्या चौकशीत खरातने भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपयांची उकळपट्टी केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे केवळ ‘स्पॉट व्हिजिट’साठी तो भक्तांकडून तब्बल पाच लाख रुपयांपर्यंत फी आकारत असल्याची माहिती समोर आली आहे.

तपासात मिळालेल्या माहितीनुसार, लोकांच्या घरी, कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वास्तू पाहण्यासाठी जाण्याच्या नावाखाली अशोक खरात मोठी रक्कम घेत असे. इतकेच नव्हे तर या भेटींसाठी तो स्वतःच्या नव्हे, तर भक्तांच्या महागड्या गाड्यांची मागणी करत असल्याचेही उघड झाले आहे. काही भक्तांनी त्याला लक्झरी गाड्याच भेट दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

Prashant narnaware : मुनगंटीवार म्हणजे विदर्भाचे ‘भगीरथ’, मुंबईची ज्ञानगंगा चंद्रपूरच्या मातीत आणणारे दूरदर्शी नेतृत्व

अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी खरातच्या दरबारात भक्तांची प्रचंड गर्दी होत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र या गर्दीतही आर्थिक स्तरावर भेदभाव केला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. जास्त पैसे देणाऱ्या भक्तांना प्राधान्य देऊन त्यांना त्वरित दर्शनाची सोय केली जात होती, तर इतरांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत होती. या दरबारातून काही भक्तांकडून २० लाखांपर्यंत रक्कम उकळल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, शिर्डीतील चार एकर जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात याच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ जमीनमालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात, तसेच अरविंद बावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे यांचा समावेश आहे.

Ncp constitution : राष्ट्रवादीच्या नव्या घटनेतून ओबीसी, अल्पसंख्याक आणि सामाजिक सेल वगळले?

फिर्यादीत आरोपींनी कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. फसवणूक आणि सावकारकी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणातील व्यवहारांची एसआयटीमार्फत सखोल चौकशी सुरू असून शिर्डीत खरातची कोट्यवधींची मालमत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.

error: Content is protected !!