व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Ashok kharat case : आधी बापाचे कारनामे उघडकीस, आता मुलगाही फरार

Ashok kharat case : आधी बापाचे कारनामे उघडकीस, आता मुलगाही फरार

nashik-ashok-kharat-case-son-missing-new-twist : अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट, तपासात गुंतागुंत

Nashik: नाशिक येथे अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि कोट्यवधींची संपत्ती उभारल्याचा आरोप असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवा आणि धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात आधीच विविध तपास यंत्रणा कामाला लागलेल्या असताना आता त्यांचा मुलगा हर्षवर्धन खरात पोलिसांच्या चौकशीनंतर अचानक गायब झाल्याने तपास अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे.

अशोक खरातला अटक झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू होती. याच पार्श्वभूमीवर विशेष तपास पथकाने हर्षवर्धन खरात याची सलग दोन दिवस कसून चौकशी केली होती. या चौकशीत त्याने काही महत्त्वाचे आणि धक्कादायक खुलासे केल्याची माहिती समोर आली. मात्र चौकशी पूर्ण झाल्यानंतर तो अचानक नॉट रिचेबल झाला असून, पोलिसांना कोणतीही माहिती न देता तो शहरातून बेपत्ता झाला आहे.

दरम्यान, अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हीही गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. एकाच कुटुंबातील दोन महत्त्वाचे सदस्य पोलिसांच्या हाती न लागल्याने या संपूर्ण रॅकेटची व्याप्ती किती मोठी आहे, याचा अंदाज लावणे तपास यंत्रणांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.

Sunetra pawar – बारामतीत महासंग्राम,१९ उमेदवारांविरोधात सुनेत्रा पवारांची खरी कसोटी

गायब होण्यापूर्वी हर्षवर्धनने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात घरात मोठ्या प्रमाणावर रोकड येत असल्याची कबुली दिली होती. मात्र हे पैसे नेमके कुठून येत होते आणि कोणत्या मार्गाने व्यवहार होत होते, याची माहिती नसल्याचे त्याने स्पष्ट केले. सर्व आर्थिक व्यवहारांचे नियंत्रण पूर्णपणे अशोक खरात यांच्याकडेच असल्याचेही त्याने नमूद केले होते. या कबुलीमुळे केवळ अध्यात्माच्या नावाखाली शोषणच नव्हे, तर काळा पैसा आणि बेनामी मालमत्तेच्या व्यवहारांचाही तपास अधिक वेगाने पुढे सरकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Nitin Gadkari on Datta Meghe : दैवतं बदलण्याची गरज नाही; गडकरींनी दत्ताभाऊंना दिला होता निष्ठा कायम ठेवण्याचा सल्ला!

हर्षवर्धन खरात अचानक बेपत्ता झाल्यामुळे विशेष तपास पथकासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तो फरार आईच्या संपर्कात आहे का, पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने हा मार्ग अवलंबला आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांकडून आता तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून, संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!