Ashok kharat case : कोणाच्यातरी महत्वाकांक्षा दडपण्यासाठी कट रचल्याची शंका!

raj-thackeray-ashok-kharat-case-political-angle-maharashtra-news : राज ठाकरेंचा थेट सवाल; अशोक खरात प्रकरणाचा राजकीय वापर होतोय का?

Mumbai: नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना या प्रकरणावरून आता राजकीय वादही चांगलाच पेटला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर बेधडक प्रतिक्रिया देत या प्रकरणाचा राजकीय हेतूंसाठी वापर केला जात असल्याची शंका व्यक्त केली आहे. कोणाच्या तरी महत्वाकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर होत असल्याची माहिती आपल्या कानावर आल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवरही अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण शासनानेच उघडकीस आणल्याचे म्हटले असताना, जर असे असेल तर इतका काळ हे प्रकार सुरू असताना त्याचा सुगावा का लागला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात काही राजकीय व्यक्तींच्या नावांभोवती संशयाची सुई फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.

Vijay Wadettiwar: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर १०० कोटींचा मानहानीचा दावा

या प्रकरणातील उघड होत असलेल्या तपशीलांवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, अशोक खरातच्या कृत्यांबाबत समोर येणारी माहिती वाचून अक्षरशः गरगरल्यासारखे झाले. काही दिवसांपूर्वी गुढी पाडवा मेळाव्यात महाराष्ट्राच्या महान परंपरेचा गौरव केला होता, ज्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा आणि प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या महान व्यक्तींचा उल्लेख होता. मात्र त्याच महाराष्ट्रात अशोक खरातसारखा व्यक्ती राजकारण्यांच्या आशीर्वादाने अशा प्रकारे वावरत असल्याचे त्यांनी अत्यंत खेदजनक असल्याचे म्हटले.

राजकीय व्यवस्थेवर टीका करताना त्यांनी म्हटले की, सध्या संपूर्ण राजकीय व्यवस्थेचे लक्ष केवळ सत्तेसाठीच्या धडपडीत अडकले आहे. आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद आणि सत्तेत टिकून राहण्यासाठी सुरू असलेल्या स्पर्धेमुळे मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. अशा वातावरणात कोणताही व्यक्ती चमत्काराचे आमिष दाखवत असेल तर राजकारणी त्याच्या मागे लागतात, ही परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.

Datta Meghe death : मैत्रीचा ओलावा! दत्ता मेघे यांच्या निधनानंतर सांत्वनासाठी शरद पवार आज नागपुरात

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात उघड झालेल्या माहितीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नाशिकमधील मीरपूर परिसरात ईशानेश्वर मंदिराच्या मागील जंगलात भक्तांना बोलावून अघोरी कृत्ये करून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे. चिंचोके मंत्रोच्चार करून पवित्र केल्याचे सांगत लाखो रुपयांना विक्री केल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील तपासात आणखी गंभीर माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.