Ashok nete: सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राची मान उंचावली !

Sudhir Mungantiwar Makes Maharashtra Proud : जनसेवा, प्रामाणिक नेतृत्व व विकासकार्याचा गौरव

Chandrapur : सोने जेव्हा तावून सुलाखून भट्टीतून बाहेर पडते, तेव्हा त्या सोन्याला झळाळी प्राप्त होते. अशाच सामाजिक, राजकीय परिस्थीतीच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेले नेतृत्व म्हणजे राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार. त्यांच्या पहाडासारख्या कर्तृत्वाने त्यांनी आपले, जिल्ह्याचे अन् येवढेच नव्हे तर महाराष्ट्राचे नाव जगभर उंचावले आहे. अशा या असामान्य नेतृत्वाला नुकतेच लंडन येथे ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ या सन्मानाने गौरवण्यात आले. लोकमत समुहातर्फे हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ हा मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. जनसेवा, प्रामाणिक नेतृत्व व विकासकार्य यांचा गौरव म्हणून मिळालेला हा सन्मान केवळ व्यक्तीपुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी विशेष अभिमानाचा क्षण ठरला आहे.

Unique Honor : सुधीर मुनगंटीवार यांचा असाही चाहता, दिली अनोखी भेट !

या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी सुधीर मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी डॉ. नेते यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांना मिठाई भरवली आणि भाऊंच्या यशाचा आनंद व्यक्त केला.

Sudhir Mungantiwar : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी गणेश प्रतिष्ठापना

सत्कार प्रसंगी भावना व्यक्त करताना डॉ. नेते म्हणाले, “जनतेच्या सेवेसाठी अखंडितपणे कार्यरत राहून, विकासाच्या मार्गावर सतत पुढे नेत असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना मिळालेला हा आंतरराष्ट्रीय सन्मान आपल्यासाठी मोठा अभिमान आहे. या गौरवामुळे महाराष्ट्राची मान अधिक उंचावली असून महाराष्ट्राची शान वाढली आहे.” सत्काराच्या या सोहळ्यावेळी परिसरात उत्साह, अभिमान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.