Breaking

Ashok Uike : आदिवासींच्या श्रद्धास्थानी सांस्कृतिक भवन

A tribal cultural building will be set up at Kachargarh : कचारगड यात्रेच्या निमित्ताने आदिवासी विकास मंत्र्यांची घोषणा

Gondia आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे भव्य सांस्कृतिक भवन उभारण्यात येईल. अशी घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली. यात्रेनिमित्त देशातील विविध भागातून भाविक येतात. आदिवासी संस्कृतीचे दर्शन होते. या सर्व गोष्टींचा विचार करून कचारगड येथे हे भवन उभारणार असल्याचे अशोक उईके म्हणाले.

सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे येत्या १० फेब्रुवारीपासून आदिवासी समाजाच्या धार्मिक महोत्सव व यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी यात्रा व पर्यटनासाठी येणाऱ्या भाविक व नागरिकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याचा आढावा घेण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. आदिवासी समाज हा निसर्ग पूजक आहे. अद्यापही त्यांनी सांस्कृतिक वारसा जपला

Perverted counselor case : समुपदेशकच निघाला चोर !

आहे. या संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून कचारगड धनेगाव येथे सांस्कृतिक भवन उभारले जाणार असल्याने उईके यांनी सांगितले. कचारगड येथील यात्रेत भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये व परिसरातील भागातील घटनांवर नजर ठेवण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, स्वच्छता विभागाच्या वतीने तात्पुरते सार्वजनिक शौचालयासह २४ तास पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Vidarbha farmers : शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली तूर

गेल्या १० वर्षांत कचारगड याठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. पण अद्यापही त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने सोयी सुविधांचा अभाव आहे. या स्थळाचा पर्यटन व तीर्थस्थळाच्या दृष्टीने विकास व्हावा यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच वर्षभर या ठिकाणी पर्यटन वाढावे यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली.