Ashwinis husband angry; opposed to granting parole : अश्विनी बिद्रेचां पती संतप्त ; कुरुंदकरला पॅरोल देण्यास दर्शवला स्पष्ट विरोध
Kolhapur: सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या खुनाचा सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मुख्य आरोपी बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर हा अजूनही पोलीस खात्याचा जावई आहे का? असा संतप्त सवाल मयत अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच कुरुंदकरला पॅरोल देण्यास स्पष्ट विरोध दर्शवला आहे.
अभय कुरुंदकर सध्या छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. 20 जून रोजी कोल्हापुरात त्याच्या मुलाचे लग्न आहे. त्यासाठी पॅरोल म्हणजे अर्जित रजा मिळावी, अशी विनंती त्याने कारागृह प्रशासनाकडे केली आहे. त्यानुसार कारागृह प्रशासनाने राजारामपुरी पोलिसांना पत्र पाठवून लग्न कुठे आहे? कधी आहे? याचे तपशील मागवले आहेत. तसेच, त्या गुन्ह्यातील फिर्यादी राजू गोरे यांचा जबाब घेऊन पाठवण्याची विनंती केली आहे.
Prahar’s Agitation : बच्चू कडू ऐकतील, चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास !
या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलीस स्टेशनने कुरुंदकरच्या अर्जाचा तपशील गोपनीय ठेवत गोरे यांना फक्त जबाब नोंदवण्यासाठी बोलावले. प्रत मागितल्यावर पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी ‘कुरुंदकर तुमचा शत्रू असेल, आमचा नाही’ असे म्हटल्याची तक्रार गोरे यांनी केली आहे. ‘गुन्हेगार जर पोलिसांचा ‘शत्रू’ नसेल, तर मग जनतेचा काय विश्वास राहील? असा सवाल गोरे यांनी उपस्थित केला आहे.
पोलीस अर्ज किंवा माहिती का लपवत आहे? की कुरुंदकरबरोबर त्यांचे काही लागेबांधे आहेत? की आणखी काही कारण आहे. आम्हाला न्याय मिळणार आहे की नाही? की सत्तेचा माज असाच चालणार आहे, असा संतप्त सवालही त्यांनी व्यक्त केला. तसेच कुरुंदकर आणि तत्कालीन पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यातील संबंधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कारागृह विभागाचा कार्यभार सांभाळताना सुपेकर यांचा संपर्क कुरुंदकर आणि त्याच्या कुटुंबीयांशी झाला असावा, आणि पॅरोल अर्ज प्रक्रियेत त्यांचा हस्तक्षेप असण्याची शक्यताही गोरे यांनी व्यक्त केली.
Maharashtra Politics : संजय शिरसाट म्हणतात ‘उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर भेटायला नक्की जाईन’
नवी मुंबईतील कळंबोली येथून 15 एप्रिल 2016 रोजी पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे या अचानक बेपत्ता झाल्या. त्यामागे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांचा हात असल्याचा आरोप अश्विनी यांच्या कुटुंबियांनी केला होता. तपासात सुरुवातीला पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोपही बिद्रे कुटुंबाकडून करण्यात आला होता. अश्विनी यांचा विवाह 2005 साली हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर एकाच वर्षात त्यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती मिळवली. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली नेमणूक पुणे येथे, तर त्यानंतर सांगली येथे झाली. याच काळात सांगलीतील पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्याशी त्यांची ओळख आणि जवळीक निर्माण झाली.
2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्यामुळे त्यांची बदली रत्नागिरी येथे झाली. मात्र, कुरुंदकर तिथेही अश्विनीला भेटण्यासाठी जात होता. हे सर्व प्रकार अश्विनी यांचे पती आणि वडिलांच्या लक्षात आले. या नंतर अश्विनी आणि कुरुंदकर यांच्यात वारंवार वाद होऊ लागले. वाद इतके टोकाचे झाले की, कुरुंदकरने अश्विनीला ‘गायब’ करण्याची धमकी दिली होती, असा दावा करण्यात आला. 2015 मध्ये अश्विनी यांची बदली नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात झाली. मात्र, त्या ठिकाणी त्या हजरच झाल्या नाहीत. या बाबत पोलिस खात्याकडून त्यांच्या गैरहजेरीवर प्रश्न उपस्थित करणारे पत्र पाठवण्यात आले.
Rohit Pawar : जसे काही भाजप नेते स्वतःच बंदुका घेऊन लढायला गेले होते !
त्यानंतरच अश्विनी यांचे कुटुंबीय सतर्क झाले आणि त्यांना त्या बेपत्ता असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर तपासात अश्विनी यांची क्रूर पद्धतीने हत्या करून मृतदेहाचा पुरावा नष्ट करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला एप्रिल 2025 साली जन्मठेप आणि 20 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.