Khamgaon–Jalna train awaits a stop at Shegaon for 116 years : एलटीटी-बल्लारशहा एक्स्प्रेसला थांबा मंजूर, रेल्वे प्रकल्पाला नवे राजकीय ‘सिग्नल’
Shegao शेगाव येथे एलटीटी–बल्लारशहा एक्स्प्रेसला थांबा मंजूर झाल्यानंतर ११६ वर्षांपासून प्रलंबित असलेला खामगाव–जालना रेल्वेमार्गाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा हा निर्णय स्वागतार्ह असला, तरी त्याच निमित्ताने दीर्घकाळ रखडलेल्या रेल्वे प्रकल्पावर नव्याने चर्चा रंगू लागली आहे.
विदर्भाची ‘पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे रेल्वे थांब्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट घेतली. या बैठकीत खामगाव–जालना रेल्वेमार्गाचा मुद्दा चर्चेत आल्याची माहिती समोर येत असून, सकारात्मक संकेत मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
|https://sattavedh.com/high-court-high-court-judges-reprimand-a-petitioner-for-directly-sending-a-letter-to-the-court/
मात्र, हा विषय नवीन नाही. यापूर्वीही अनेकदा आश्वासने, बैठका आणि चर्चांचे फेरे झाले; पण प्रत्यक्षात प्रकल्प पुढे सरकताना दिसला नाही. त्यामुळे ‘चर्चा वेगवान, निर्णय मंद’ अशीच परिस्थिती असल्याची टीका स्थानिक पातळीवर होत आहे.
दरम्यान, जळगाव–जालना रेल्वेमार्गाचा प्रकल्प मात्र पुढे सरकत असून, भूसंपादन प्रक्रियाही सुरू झाल्याने तो मार्ग प्राधान्यक्रमात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याउलट खामगाव–जालना मार्ग अजूनही प्रतीक्षेत असल्याने विदर्भातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
Ashok kharat case : खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे 100 तक्रारी, त्यात 70 टक्के महिलांच्या!
शेगाव थांब्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा या रेल्वेमार्गाचा मुद्दा ऐरणीवर आला असला, तरी ‘यावेळी तरी काही ठोस निर्णय होणार का?’ हा प्रश्न कायम आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय गती मिळाल्यासच हा प्रकल्प मार्गी लागू शकतो, अन्यथा तो पुन्हा आश्वासनांच्या फेऱ्यातच अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.








