Breaking

Ashwni Vaishnav : वंदे भारतला अकोल्यात थांबा द्या, खासदारांची मागणी

 

Demand for Vande Bharat to stop in Akola : अकोल्यातील रेल्वे प्रकल्पांना गती; मंत्र्यांनी घेतली बैठक

Akola अकोलातील रेल्वे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात तसेच शहराचा सर्वांगीण रेल्वे विकास व्हावा यासाठी खासदार अनुप धोत्रे Anup Dhotre यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विविध प्रकल्पांसाठी पाठपुरावा केला. यानंतर मंत्री वैष्णव यांनी दिल्लीतील आपल्या दालनात रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह विशेष बैठक घेतली. यामध्ये अकोला रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणास गती देण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.

पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार असून, या गाडीला अकोल्यात थांबा देण्याची जोरदार मागणी खासदार धोत्रे यांनी बैठकीत केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले असून, लवकरच अकोल्यात थांबा देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

Akola Congress : अकोल्यातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना संधी केव्हा? — स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर

अकोला-अकोट रोडला जोडणाऱ्या आकोट फाईल उड्डाणपुलासाठी ₹३३.५० कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या अभियंता विभागाने सादर केला आहे. या प्रस्तावासंदर्भात सर्व तांत्रिक बाबींची तपासणी करून लवकरात लवकर मंजुरी देण्याचे निर्देश रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिले.

या बैठकीत अकोला रेल्वे स्थानकावरील विविध प्लॅटफॉर्म्स, पिट्स (गाड्यांच्या देखभाल व्यवस्था) तसेच स्थानकाच्या विस्तारीकरणासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच आवश्यक निधी व यंत्रणा दिली जाणार आहे.

Sanjay Shirsat : शिरसाट म्हणतात, ‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जायंत?’

प्रयागराज, अयोध्या व काशी या उत्तर भारतीय धार्मिक स्थळांकडे अकोल्यातून थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणीही खासदार अनुप धोत्रे यांनी बैठकीत केली.

अकोल्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याबाबत दाखवलेल्या तत्परतेबद्दल खासदार धोत्रे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. “अकोल्यावर मंत्री वैष्णव यांचे विशेष प्रेम आहे. त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघातील २० लाख मतदारांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो,” असे खासदार धोत्रे यांनी म्हटले.