Breaking

Assembly Budget : निधी मंजूर झाला, कामाचे आदेशही आले!

Rs. 23 crore approved for expansion of health services in Buldhana district : बुलढाणा जिल्ह्यात आरोग्य सेवा विस्तारासाठी २३ कोटी

Buldhana बुलढाणा जिल्ह्यात ६ ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट आणि ३४ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी सुमारे २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा होताच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला यासंदर्भात आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे वेगाने काम सुरू होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, मोताळा, संग्रामपूर आणि शेगाव येथे प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या निधीतून ६ ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट उभारले जाणार आहेत. याशिवाय, जिल्ह्यातील ३४ प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारत बांधकामासाठी प्रत्येकी ५८.२७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये खामगाव, चिखली, जळगाव जामोद, मलकापूर, मेहकर, नांदुरा, संग्रामपूर, बुलढाणा, सिंदखेडराजा आणि लोणार तालुक्यातील गावांचा समावेश आहे.

Assembly Budget : बुलढाण्याच्या महसूल भवनासाठी १५.७१ कोटी!

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा निधी मंजूर करण्यात आला असून, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला लवकरात लवकर कामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकट होऊन नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सेवांचा लाभ मिळणार आहे, असा विश्वास केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे.

Sudhir Mungantiwar : सर्व घटकांना सामावून घेणारा लोकाभिमुख अर्थसंकल्प  

खामगाव तालुक्यातील नांद्री , बोरजवळा ,पारखेड ,चिखली तालुक्यातील इसोली,गांगलगाव,सवना,करवंड,डोंगर शेवली,पळसखेड दौलत जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो मलकापूर तालुक्यातील देवधाबा हरणखेड म्हैसवाडी दाताळा मेहकर तालुक्यातील दुधा, मोडा, वरवंड, चायगाव, नांदुरा तालुक्यातील आलमपूर संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा, मनसगाव बुलढाणा तालुक्यातील सातगाव म्हसला, मढ, सिदखेडराजा तालुक्यातील पांगरी उगले लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू, बुमराळा, गुंजखेड, वडगाव तेजन येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात इमारत बांधकामासाठी हा निधी मंजुर झाला आहे.