Builders set up pubs, bars and restaurants in IT mat area : ‘आश्वासन समिती’च्या पहिल्याच बैठकीत तक्रारींचा वर्षाव
Amravati राज्य विधिमंडळाच्या अधिनस्त असलेल्या आश्वासन समितीच्या पहिल्याच बैठकीत कामकाजाची ठसठशीत चुणूक पाहायला मिळाली. आयटी चटई क्षेत्रात पब, बार आणि रेस्टॉरंट उभारून बिल्डरांनी शासकीय जमिनी बळकावल्याची गंभीर बाब यावेळी उजेडात आली. या प्रकरणावर समिती अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी सखोल चौकशीचे निर्देश दिले.
राणा यांच्या अध्यक्षतेत विधानभवनाच्या सातव्या मजल्यावर ही बैठक पार पडली. या बैठकीत मिठी नदी खोलीकरणातील गाळ काढणे, रुंदीकरण व संरक्षण भिंतीच्या सीमेंट काँक्रिटीकरणातील अनियमितता तसेच १२ मिलच्या जागेचा वाद अशा महत्त्वाच्या तक्रारी चर्चेत आल्या. बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली आयटी तज्ज्ञ, विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या समितीच्या स्थापनेचे आदेश देण्यात आले आहेत.
Amravati Police : अमरावती परिक्षेत्रात २० पीएसआय बदलले, आयुक्तालयात आठ नवीन उपनिरीक्षक
या समितीने वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून पुढील कारवाई केली जाईल, असे आमदार राणा यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या १२४ लीज जमिनींपैकी काही जागांमधून सरकारला सुमारे १२० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्या निधीसाठी स्वतंत्र शीर्ष तयार करण्याचा निर्णयही समितीने घेतला.
Nagpur Municipal Corporation : रस्ते खोदून ठेवले आणि पाऊस लवकर आला, आता मनपाला आली जाग
नगरविकास विभागाच्या ५८ विवरणपत्रांचे वाचन यावेळी झाले. यामध्ये प्रधान सचिव, महापालिका आयुक्त, उप सचिव आणि अवर सचिव यांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. मिठी नदीच्या पहिल्या निविदेची रक्कम सुमारे १८६ कोटी होती. त्याच कंत्राटदाराला पुढे ५३४ कोटींचे काम देण्यात आले, यावरही समितीत सविस्तर चर्चा झाली.








