Breaking

Attempt burn down residence: धक्कादायक ..भाजप आमदाराचं निवासस्थान जाळण्याचा प्रयत्न!

Actions of farmers affected by non-payment of damages due to heavy rains : अतिवृष्टीत नुकसानीचा मोबदला न मिळाल्याने पीडित शेतकऱ्यांचे कृत्य

Buldhana: जळगाव जामोद येथे एक धक्कादायक घटना घडली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याने आ.संजय कुटे यांचं निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाआहे. याप्रकरणी, संबंधित शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मे महिन्यातच राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यात अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. फळबागा उध्वस्त झाल्या. मात्र, अद्यापही या शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळाली नाही. प्रशासनाने पंचनामे केले मात्र मदत न मिळाल्याने शेतकरी मदतीची मागणी करत आहेत. लोकप्रतिनीधींना भेटून गाऱ्हाणं मांडत आहेत.

Balasaheb thorat : आश्वासन पाळणे सरकारचे नैतिक, राजकीय कर्तव्य

जळगावमधील भाजप नेते आणि आमदार संजय कुटे हे शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानी हजर असताना संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी विशाल मुरुड याने संजय कुटे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात प्रवेश मिळवला व हातात पेट्रोलचे कॅन घेऊन मला अतिवृषटीमुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला अद्याप न मिळाल्याने मी आमदारांचा बंगला जाळून टाकतो, असं म्हणत पेट्रोलचे कॅन घेऊन बंगल्याच्या प्रवेश द्वारकडे मार्गक्रमण केले.

Bachhu Kadu Protest : दगाफटका केला तर.. सरकारला धडा शिकवण्याचा इशारा

शेतकरी विशाल बंगल्याच्या प्रवेशद्वाराकडे जात असताना आमदार कुटे यांचे स्वीय सहायक यांनी त्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. याप्रकरणी पोलिसांनी शेतकरी विशाल विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, पुढील चौकशी जळगाव जामोद पोलीस करत आहेत.

Prahar’s Agitation : बच्चू कडूंसाठी जरांगेंचे आवाहन, मराठ्यांनी कंबर कसली !

डॉ. संजय कुटे भाजपचे नेते असून जळगाव जामोद मतदारसंघातून ते गेल्या 20 वर्षांपासून आमदा आहेत. सन 2004 साली ते प्रथम आमदार बनून विधिमंडळात पोहोचले. विधिमंडळात देवेंद्र फडणवीसांच्या मागच्या बाकड्यावर बसून सत्तेत असताना विरोधकांना आणि विरोधात असताना सत्ताधाऱ्यांना आक्रमकपणे उत्तर देणारे नेते म्हणून डॉ. कुटे यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे.