व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Akola Municipal corporation : अकोल्यात ‘समांतर’ महापालिका; महापौरांना चिठ्ठी अन् विरोधकांना ‘पडीत...

Akola Municipal corporation : अकोल्यात ‘समांतर’ महापालिका; महापौरांना चिठ्ठी अन् विरोधकांना ‘पडीत वॉर्ड’, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना झाडले

Opposition holds a symbolic municipal corporation session in Akola Municipal Corporation : १६ नगरसेवकांच्या निलंबनाचे पडसाद; अधिकृत सभेवर विरोधकांचा बहिष्कार

Akola महापालिकेतील १६ नगरसेवकांच्या निलंबनाचे पडसाद शुक्रवारी उमटले. सत्ताधाऱ्यांच्या धोरणांचा निषेध करत विरोधी गटाने अधिकृत सभेवर बहिष्कार टाकला आणि विरोधी पक्षनेत्याच्या कक्षाबाहेर आपली ‘प्रतिकात्मक सभा’ भरवली. या अनोख्या आंदोलनाद्वारे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराची खिल्ली उडवत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.

या प्रतिकात्मक सभेत काँग्रेसच्या निलोफर खान यांची महापौरपदी, तर वंचित बहुजन आघाडीचे पराग गवई यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली. नगर सचिवांची भूमिका विरोधी पक्षनेते डॉ. जिशान हुसेन यांनी बजावली. सभेच्या सुरुवातीलाच, सत्ताधाऱ्यांनी केलेले १६ नगरसेवकांचे निलंबन रद्द करण्याचा ठराव या सभेने मंजूर केला.

Pratap sarnaik : ‘ऑपरेशन टायगर’वरून सरनाईकांचा दावा; “८ खासदारांची नावं समोर, एक जण सेफ”

वंचितचे सुनील इन्नाणी यांनी घरकुल योजनेसाठी कंपनी नेमण्याच्या निर्णयावर कडाडून टीका केली. केवळ भ्रष्टाचारासाठी हा घाट घातल्याचा आरोप करत त्यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली. निलेश देव यांनी संबंधित कंपनीला ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याची मागणी मांडली, ज्याला सभेत मंजुरी देण्यात आली. कचरा घंटागाडीच्या मुद्द्यावरूनही विजय इंगळे आणि निलेश देव यांनी सत्ताधाऱ्यांना घेरले.

नागरिकांकडून शुल्क घेऊन आणि महापालिकेकडून दरमहा २७ लाख रुपये देऊनही ही लूट कोणासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “प्रत्येक गोष्टीसाठी एजंट लागत असेल, तर महापौर कसा असावा यासाठीही आता एजंट नेमा,” असा टोला निलेश देव यांनी लगावला.

Buldhana Politics : पक्षप्रवेश मोहिमेने तणाव; शिंदेसेना आक्रमक, भाजपमध्ये खदखद

 

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सभागृहात प्रवेश नाकारण्याच्या प्रयत्नांचा डॉ. जिशान हुसेन यांनी निषेध केला. महापालिकेचे वास्तव जनतेसमोर येऊ नये म्हणून हा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. या उलट, विरोधकांच्या प्रतिकात्मक सभेत पत्रकारांसाठी सन्मानाची जागा राखीव ठेवण्यात आली होती. जागा कमी पडत असेल, तर नियोजन भवनात सभा का घेतली जात नाही, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

प्रिया शिरसाट, पराग गवई आणि विजय इंगळे यांनी निधी वाटपातील भेदभावाचा मुद्दा लावून धरला. “जर विरोधकांच्या प्रभागांना कमी निधी दिला जात असेल, तर त्या भागातील जनतेकडून मालमत्ता करही कमी घ्यावा,” अशी आक्रमक मागणी विजय इंगळे यांनी केली.

Uddhav Thackeray Shivsena : ठाकरेंची सेना लागली कामाला, गावपातळीवर ‘फिल्डींग’!

सत्तेचे कामकाज कसे चालते, याचे विडंबनही यावेळी करण्यात आले. महापौरांना निर्णय घेण्यापूर्वी चिठ्ठ्या पुरवल्या जाणे आणि विरोध करणाऱ्यांना ‘पडीत वॉर्ड’ देण्याचे आमिष दाखवणे, अशा कृतींतून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच थट्टा केली. महापालिकेच्या इतिहासात सत्ताधारी गटाच्या सभेपेक्षा विरोधकांच्या या समांतर सभेचीच शहरात अधिक चर्चा रंगली होती.

error: Content is protected !!