delayed Axiom-4 mission launch, 15th human space mission : विलंब झालेली एक्सिओम-4 मिशन लाँच, 15 वी मानवी अंतराळ मोहिम आहे
New Delhi : विविध कारणामुळे रखडलेली मोहीम आज यशस्वी झाली. भारतीय अंतराळवीर शुंभाशु शुक्ला आणि तीन अन्य अंतराळवीर एक्सिओम-4 मिशनसाठी रवाना झाले. ते आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर पोचत आहेत. स्पेसएक्सने जाहीर केलं होतं. स्पेस स्टेशनवर प्रक्षेपणासाठी सर्व सिस्टिम चांगल्या दिसत आहेत. स्पेसएक्सकडे या मिशनसाठी ट्रान्सपोर्टची जबाबदारी होती.
एक्सिओम-4 हे स्पेसएक्सचे 53 वे ड्रॅगन मिशन आहे आणि 15 वी मानवी अंतराळ मोहिम आहे. या मोहिमेत शुभांशू शुक्ला यांच्यासह कमांडर पेगी व्हिटसन , मिशन स्पेशालिस्ट स्लाव्होस उजनांस्की आणि मिशन स्पेशालिस्ट टिबोर कापू हेही अंतराळात निघाले आहेत. ही मोहीम आधी 8 जून रोजी सुरू होणार होती पण खराब हवामानामुळे ती 10 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आज अखेर शुंभाशु शुक्ला यांनी अंतराळात उड्डाण केलं.
Sanjay Raut : फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये ५० टक्के घोटाळा !
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला उत्तर प्रदेशातील लखनऊचे रहिवासी आहेत. शुभांशू यांनी लखनऊमधील सिटी मॉन्टेसरी स्कूलच्या अलीगंज शाखेतून १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) परीक्षा दिली आणि त्यात ते पास झाले. २००५ मध्ये एनडीएमधून पदवी घेतल्यानंतर, जून २००६ मध्ये ते भारतीय हवाई दलात लढाऊ पायलट म्हणून रुजू झाले. आतापर्यंत त्यांनी एसयू-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जग्वार, हॉक, डोर्नियर २२८ आणि एएन-३२ ही लढाऊ विमाने उडवलेली आहेत. २०१९ मध्ये त्यांना विंग कमांडर आणि मार्च २०२४ मध्ये ग्रुप कॅप्टन पदावर बढती मिळालेली आहे. आता ते अंतराळात प्रयोग करताना दिसणार आहेत.
Medha Kulkarni : ‘ एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव..’, मेधा कुलकर्णी यांच्यावर प्रहार
अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय एजन्सी इस्रो यांच्यातील करारानुसार, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची मोहिमेसाठी निवड करण्यात आली. अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज 25 जून रोजी अॅक्सियम मिशन 4 अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले. स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटशी जोडलेल्या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये उड्डाण केले. ड्रॅगन अंतराळयान 26 जून रोजी दुपारी 4.30 वाजता सुमारे 28.5 तासांनंतर आयएसएसशी जोडले जाईल.
__