व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Baba Ramdev : जय जवान जय किसान जय मिहान हा महाराष्ट्र तो...

Baba Ramdev : जय जवान जय किसान जय मिहान हा महाराष्ट्र तो स्वप्न पूर्ण करू

Jay Jawan, Jay Kisan, Jay Mihan, let’s fulfill Maharashtra’s dream : संत्र्याचे उत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या रोपांची नर्सरी तयार करणार

Nagpur : नागपूर मिहानमध्ये आज (९ मार्च) सुरू झालेल्या प्रकल्पाची क्षमता दररोज ८०० टन इतकी आहे. यामुळे शेतकऱ्यांना समृद्धी मिळणार आहे. यात कुठलेही ब्रिजरेविटी नसणार आहे. नैसर्गिक पद्धतीने ज्यूस तयार करून मिळणार आहे. ‘जय जवान – जय किसान – जय मिहान’ हे महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करू, असा विश्वास पतंजली योग पिठाचे प्रमुख बाबा रामदेव यांनी व्यक्त केला.

आज (९ मार्च) नागपूर मेगा फुड पार्कच्या उद्घाटनाच्या वेळी बाबा रामदेव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आज संत्र्याचे उत्पादन वाढवण्यासाठी, चांगल्या पद्धतीची रोपे तयार करण्यासाठी नर्सरी तयार करणार आहे. अन्य पद्धतीची फळांपासूनही नैसर्गिक पद्धतीने ज्यूस काढण्याचा काम या प्रकल्पात होणार आहे. संत्रा निर्यात करण्यासाठीसुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. विदर्भाला लागून गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान लगतच्या राज्यांतून संत्रा आणण्यासाठी आम्ही जाणार आहोत.

CM Fadnavis at Patanjali Food Park : फडणवीस मुख्यमंत्रीपदी नसल्याने फूड पार्क रेंगाळला?

डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, ट्रम्प यांनी टरीफ टेरोरिझमचा नवीन कीर्तीमान रचला आहे. लोकतंत्राची मर्यादा पायदळी तुडवली आहे. वर्ल्ड बँक कोणालाच ऐकत नसून डॉलरची किंमत वाढवली आहे. गरीब विकसनशील देशांच्या पैसाची किंमत कमी केली. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प एक प्रकारे आर्थिक आतंकवाद चालवत आहेत.

ट्रम्प, पुतीन, शी झिम्पिंग यांचा काही भरवसा नाही. भारताला विकसनशील बनवल पाहिजे. काही शक्तिशाली देश जगाला विनाशाकडे नेण्याचे काम करत आहेत. त्यासाठी भारतीयांनी एकजूड होऊन सशक्त राष्ट्र निर्माण करून विध्वंसक ताकदींना उत्तर दिले पाहिजे, असेही बाबा रामदेव म्हणाले.

कॅलिफोर्नियामध्ये हिंदू मंदिर हल्ला करण्यात आला. युरोप अमेरिका ब्रिटनकडून ज्या पद्धतीने सनातन धर्मांवर निशाणा साधला जात आहे. मजहबी आतंकवाद पसरवला जात आहे, हे दुर्दैवी आहे. यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन यावर उपाय शोधला पाहिजे. यासाठी भारताने पुढाकार घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.

Dhobi Society : देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेते असताना घेतलेल्या भूमिकेची आठवण ठेवावी!

औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राजकारण पेटलं आहे. यासंदर्भात विचारले असता, औरंगजेब हा भारताचा आदर्श नाही. औरंगजेबाचं खानदान हे लुटेऱ्यांचं खानदान होतं. बाबर असो की त्याचं कुटुंब, ते भारताला लुटण्यासाठीच आले होते. हजारो महिलांवर त्यांनी अत्याचार केला. हे लोक आपले आदर्श होऊ शकत नाही. आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असे बाबा रामदेव म्हणाले.

error: Content is protected !!