Breaking

Babaji Date Women’s Cooperative Bank : एनओसी असूनही नवीन कर्जासाठी अडचण

Difficulty in getting new loans despite having NOC : गहाणमुक्त प्लॉटवर ‘सरसाई’चे संकट; महिला बँकेतील प्रकार

Yavatmal बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील २४१ कोटींच्या गैरव्यवहारामुळे हजारो खातेदार, ठेवीदार अडचणीत आले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचा तपास नेमका कुठपर्यंत आला, हेदेखील समजायला मार्ग नाही.

अशा स्थितीत कर्जाचा भरणा करून एनओसी प्राप्त केलेल्या सर्वसामान्य नागरिकाच्या प्लॉटवर बोजा कायम असल्याचे सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सिक्युरिटायझेशन अॅसेट रिकन्स्ट्रक्शन अॅण्ड सिक्युरिटी इंटरेस्ट ऑफ इंडियाच्या (सरसाई) Central Registry of Securitization, Asset Reconstruction and Security Interest of India वेबसाइटवरील नोंदीवरून समोर आले आहे.

त्यामुळे नवीन कर्ज घेण्यासाठी अडचण होत आहे. केंद्र शासनाने गहाणखतांची नोंदणी ठेवणे आणि मालमत्तेवरील कर्जासंदर्भात फसवणूक रोखणे यांसाठी ‘सरसाई’ ही वेबसाइट सुरू केली आहे. कुठल्याही बँकेतून कर्ज घेतल्यानंतर सातबाराप्रमाणेच वेबसाइटवरही बोजा चढविला जातो. कर्जदाराने कर्जाचा भरणा केल्यानंतर बँकेकडून ‘निल’चा दाखला देऊन प्लॉट, घर, आदी मालमत्ता गहाणमुक्त केली जाते. त्याच वेळी बँकेने यूजर्स आयडी आणि पासवर्डचा वापर करून मालमत्ता गहाणमुक्त केली असल्याची अपडेट नोंद वेबसाइटवर केली जाते.

Bacchu Kadu : बच्चू कडू विधान परिषदेत उतरणार?

कर्जदाराने कर्जाचा भरणा केल्यानंतर कर्मचाऱ्याने त्याची ‘सरसाई’ संकेतस्थळावर रीतसर नोंद करून बोजा उतरविणे गरजेचे होते. मात्र २०२१ ला कर्जाची रक्कम प्राप्त होऊनही कर्मचाऱ्याने ही प्रक्रिया पार पाडली नाही. सातबारा, फेरफारवर बोजा नसल्यामुळेच ग्राहकाने प्लॉट खरेदी केला होता. आता बँकेकडे हा बोजा कमी करण्याची मागणी केली तर यूजर्स आयडी आणि पासवर्ड आमच्याकडे नाही, ज्याच्याकडे आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल आहे, असे उत्तर देत असल्याचे ग्राहकाने सांगितले.

वर्ष लोटूनही कार्यवाही शून्य असल्याने ग्राहक संकटात सापडले आहेत. या प्रकारामुळे आणखी काही प्लॉट व इतर मालमत्तांवर ‘सरसाई’चा बोजा आहे का, याची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.