Shiv Sena protest in Dhingra square Akola : धिंग्रा चौकात आंदोलन करून नोंदवला निषेध
Akola भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकरी आणि महिलांबाबत बेताल वक्तव्यावर शिवसेना आक्रमक झाली. या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेने धिंग्रा चौक येथे निदर्शने करून निषेध नोंदविला आहे.
तुमच्या माय बापाचे पेन्शन, या लोणीकरने सुरू केली. तुझ्या बापाला पेरणीसाठी मोदी सरकार सहा हजार रुपये देते. तुझी बहीण, बायको,आई यांना लाडकी बहीण योजनेतून पंधराशे रुपये लोणीकरमुळे मिळतात’, असे बेताल व वादग्रस्त भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केले होते. या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध करण्यात येत असून शिवसेनेने मदनलाल धिंग्रा चौक येथे निदर्शने केली.
Pandharpur Wari : पंढरीच्या वारीसाठी अकोल्यावरून विशेष रेल्वे
यावेळी शिवसेना उपनेते आ. नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्या नेतूत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, अतुल पवनीकर, संजय शेळके, योगेश्वर वानखडे, चंदु तिवारी, दिलीप बोचे, युवासेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर, तालुकाप्रमुख, ज्ञानेश्वर गावंडे, ज्ञानेश्वर म्हैसने, ब्रम्हा पांडे, नितीन ताथोड, रवी मुर्तडकर, गजानन चौधरी, गजानन मानतकर, शिवा मोहोड मनीष मोहोड, युवासेना उपजिल्हाप्रमुख विशाल घरडे आदींची उपस्थिती होती.
Crime in Maravati : पहिले कारने उडवले, नंतर शस्त्राने भोसकून पोलिसाचा निर्घृण खून
राज्यभर संताप
बबनराव लोणीकर यांच्या विधानावर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. लोणीकरांना समज दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.