Bacchu Kadu : मतदानाचा पुरावा मिळालाच पाहिजे, नाहीतर काय उपयोग?

Allegation of lack of transparency in elections : बच्चू कडूंची मागणी, निवडणुका पारदर्शक नसल्याचा आरोप

Amravati राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणुका पारदर्शक राहिलेल्या नाहीत, असा त्यांनी आरोप केला आहे.

कडू म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता उरलेली नाही. अचलपूर विधानसभा मतदारसंघात तब्बल १० हजार मतदारांची नावे वेळेवर कमी झाली आहेत. अशा गोंधळात निवडणुका घेणे म्हणजे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणे होय. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे, परंतु माझे मत कुणाला पडले, हे जाणून घेण्याचाही अधिकार मतदाराला असायला हवा. निवडणूक आयोग ते दाखवू शकत नाही. माझे मत मला मिळाले, हे सिद्ध करण्याची तरतूद आयोगाने दाखवावी, हे माझे त्यांना आव्हान आहे.”

Maharashtra politics : ‘उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे’ मजकुरामुळे राजकारण तापले !

ते पुढे म्हणाले, “सध्याच्या प्रणालीत मतदाराचे मत कोणत्या उमेदवाराला गेले, हे जाणून घेण्याची कोणतीही सोय नाही. काँग्रेससह महाविकास आघाडी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करत असली, तरी माझा प्रस्ताव वेगळा आहे. ‘ईव्हीएम’ प्रणाली राहू द्या, पण ‘व्हीव्हीपॅट’ मधून दिसणारा मतदानाचा पुरावा मतदाराच्या हाती मिळाला पाहिजे. त्यावर मतदाराची सही घेतली जावी आणि तोच कागद मतपेटीत टाकता यावा. यामुळे ‘ईव्हीएम’ राहील आणि आवश्यकतेनुसार मतमोजणीही करता येईल.”

कडू यांनी जुन्या मतपत्रिकेची आठवण करून दिली. “पूर्वी मतपत्रिकेत मतदाराचे नाव, क्रमांक आणि सही अशी व्यवस्था होती. आपण आपले मत पाहू शकत होतो. पण आता ही व्यवस्था संपवण्यात आली आहे. आज तुमचे मत हवेत आहे; ते कुणाला गेले हेच माहीत नाही. इथेच भाजप जिंकला आहे, हे एक कटकारस्थान आहे,” असा आरोप त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, “शहरातील निवडणुका आधी घेऊन हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून भाजप विजय मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. याचा परिणाम ग्रामीण भागावर होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात भाजपसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याची ही आखणी दिसते.”

Local body election : स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका पुढे ढकलण अशक्य !

युतीबाबत बोलताना कडू म्हणाले, “कोणत्या पक्षासोबत युती करायची, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच तो निर्णय घेतला जाईल. आतापर्यंत आम्ही आंदोलनात व्यस्त होतो, निवडणुकीची तयारी करता आली नाही. मात्र, निवडणूक काळात शेतकरी म्हणून सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करू.”