Bacchu Kadu : बच्चू कडू विधान परिषदेत उतरणार?

Bachchu Kadu preparing for Legislative Council elections : अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणुकीची तयारी; संघटनेच्या मेळाव्यात सकारात्मक संकेत

Amravati प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू विधान परिषदेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा त्यांचा विचार आहे. पक्षातील कार्यकर्त्यांनीही त्यांच्याकडे आग्रह धरल्याचे सांगितले जाते. ही निवडणूक डिसेंबर २०२६ मध्ये होणार आहे, हे विशेष.

बच्चू कडू यांनी २००४, २००९, २०१४ आणि २०१९ असा सलग चार वेळा अचलपूर विधानसभेतून विजय मिळवला. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत त्यांचा भाजपचे प्रवीण तायडे यांनी १२,१३१ मतांनी पराभव केला. या पराभवानंतर त्यांनी विधान परिषदेच्या दिशेने पाऊल उचलले असून, शिक्षक मतदारसंघातून लढण्याची शक्यता वाढली आहे.

सध्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अपक्ष आमदार किरण सरनाईक करत आहेत. त्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपत आहे. दरम्यान, अमरावतीत झालेल्या प्रहार शिक्षक संघटनेच्या मेळाव्यात बच्चू कडूंना उमेदवारी देण्याचा आग्रह करण्यात आला. कडूंनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Uddhav Balasaheb Thackeray : अमरावती जिल्हा शिवसेना ठाकरे गटात खिंडार!

बच्चू कडू यांनी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केले. या मतदारसंघात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांतील शिक्षक मतदारांचा समावेश आहे. बच्चू कडूंच्या प्रवेशामुळे या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची आणि हाय व्होल्टेज होण्याची शक्यता आहे. शिक्षक वर्गात त्यांची ठसठशीत ओळख असून, त्यांचा जनसंपर्क आणि रोखठोक शैली लक्षात घेता ही निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरणार आहे.

Manikrao Kokate : मंत्री महोदय, कास्तकाराच्या जखमेवर मीठ चोळू नका!

अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार किरण सरनाईक हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे निश्चित आहे. त्यासोबतच आता बच्चू कडू यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे भाजपकडून माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांना या मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस सुद्धा शिक्षण मतदार संघात भाग्यश्री शक्यता असून, त्यासाठी डॉ. सुधीर ढोणे यांचा नावाचा विचार होऊ शकतो.