Bacchu Kadu : बदनाम हॉटेलमध्ये पालकमंत्र्यांचा नाश्ता; ‘दिशाभूल कोणी केली?’

Chandrashekhar Bawankule has been critisized for having breakfast at wrong hotel : बच्चू कडूंचा सरकारला सवाल; पोलिसांच्या रडारवर आहे हॉटेल

Amravati राज्याचे महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे रविवारी दुपारी स्थानिक सहकाऱ्यांसह जुना बायपासवरील एका हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये पोलिस बंदोबस्तात नाश्ता करण्यास गेले. हॉटेलच्या प्रवेशद्वारावर पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना कडक सॅल्युट दिला. सुमारे ३०-४५ मिनिटांचा हा थांबा संपताच, राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले.

हेच हॉटेल यापूर्वी पोलिस कारवाईला सामोरे गेलेले असून सध्या देखील पोलिसांच्या रडारवर आहे. हुक्का, बारबाला, टीनएज पार्टी, एमडीसेवनसारखे अवैध व्यवसाय येथे सुरू असल्याची चर्चा सर्वश्रुत आहे. त्यामुळे, पालकमंत्र्यांना तिथे नेमके कोणी नेले, त्यांची दिशाभूल कोणी केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हॉटेलचालकाविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हेही दाखल आहेत.

Shashikant Shinde : तरुणांच्या रोजगारासाठी राष्ट्रवादीच पर्याय, शशिकांत शिंदेंचा दावा

सोमवारी पोलिस वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा होती की, पालकमंत्र्यांच्या भेटीचा फायदा घेत हॉटेलचालकाने पोलिसांसमोर आपली ‘कॉलर टाईट’ केली. “माझ्या हॉटेलमध्ये दस्तुरखुद्द पालकमंत्री येतात, मग तुमची काय बिशाद?” अशा भावनेतून त्याने हा प्रसंग घडवून आणल्याचे बोलले जात आहे.

Sharap Pawar NCP : अवैध सावकारांना पोलिसांचे संरक्षण, राष्ट्रवादीचा आरोप

या घटनेवर माजी मंत्री बच्चू कडू यांनी पालकमंत्र्यांना थेट सवाल केला – “जे हॉटेल अख्ख्या शहरात अवैध धंद्यासाठी बदनाम आहे, तेथे तुम्ही पोलिस बंदोबस्तात जात आहात, म्हणजे शहराच्या पोलिस यंत्रणेला नेमका कोणता संदेश देता आहात? एकीकडे शेतकऱ्यांकडे बियाण्यांसाठी पैसे नाहीत, आणि दुसरीकडे तुम्ही सर्किट हाऊस सोडून अशा हॉटेलमध्ये जाता?”