I was offered to change the voters’ list by the ruling leaders, ex-MLA claims : बच्चू कडूंचा खळबळजनक खुलासा, पुरावे देण्याची तयारी असल्याचा दावा
Amravati विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा गंभीर आरोप आता प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीसुद्धा केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन मत चोरी आणि अतिरिक्त मतदानाचे आरोप केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता बच्चू कडू यांनीही खळबळजनक दावा करत वातावरण तापवले आहे.
मतचोरी प्रकरणावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “विधानसभा निवडणुकीच्या आधी मला 10 हजार मतदारांची लिस्ट मागितली होती. जे तुम्हाला मतदान करत नाहीत त्यांना वगळून टाकू, अशी ऑफर देण्यात आली होती. माझ्याकडे पुरावे आले की मी जाहीरपणे सगळी माहिती देणार आहे. तेव्हाचे संभाषण, रेकॉर्डिंग आणि आम्ही जी नावे दिली होती ते सर्व मीडियासमोर आणणार आहे.”
Local Body Elections : आक्षेपानंतर गण-गटांच्या प्रारूपात दोन बदल
ते पुढे म्हणाले, “त्यांनी सांगितले होते की आपले लोक कसे निवडून आणायचे तर जे तुम्हाला न भेटणारे मतदार आहेत त्यांची यादी द्या. त्यातील 10 हजार कमी करून दुसरे 10 हजार घालू. हा पुरावा मी वेळ आल्यास देईन. विशेष म्हणजे ही ऑफर सरकारमधील लोकांनीच दिली होती. अशी ताकद फक्त सरकारमधील लोकांकडेच असते.”
ऑफर स्वीकारली का, असा प्रश्न विचारला असता कडू म्हणाले :
“ते बरोबर वाटले नाही. आम्हाला फुल गॅरंटी होती की आपलं जमणारच. त्यामुळे आम्ही दहा हजार मते वगळण्याची ऑफर फेटाळली.”
Jitendra Awhad : मतांची चोरी हा राजकीय घोटाळा, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
दरम्यान, मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ नंतर अचानक मते वाढल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. राहुल गांधी यांनी तर थेट पत्रकार परिषदेत पुरावे सादर करत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यात एकाच नावाची मतदार नोंद अनेक मतदारसंघात असल्याचे दाखवले होते. त्यामुळे निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठली आहे.