Bacchu Kadu : तहसील कार्यालयात सोयाबीन, संत्रा व केळी फेकून निषेध

Protest by throwing soybeans, oranges, and bananas in the Tehsil office : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक

Amravati शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक झाली असून सोमवारी दुपारी चांदूरबाजार तहसील कार्यालयाच्या परिसरात सोयाबीन, संत्रा व केळी फेकून शासनाचा निषेध करण्यात आला. आंदोलनाच्या शेवटी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, ज्यामधून शासनाकडे तातडीच्या मागण्या पाठविण्यात आल्या.

आंदोलनकर्त्यांनी निवेदन तहसीलदारांनाच द्यावे, असा हट्ट धरल्याने काही काळ तहसील परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र उपस्थित नायब तहसीलदारांनी त्यांना शांत करून तहसीलदारांसह इतर अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संवाद साधण्याची व्यवस्था करून दिली.

District Central Cooperative Bank : भेटवस्तू वाटपावरून संचालक मंडळात आरोप–प्रत्यारोप

प्रमुख मागण्या

शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ जाहीर करावी.

जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान पावसाळ्यातील सततचा पाऊस, धुके व अतिवृष्टीमुळे संत्रा, केळी, सोयाबीन, कपाशी, तूर, कडधान्य, भाजीपाला व फळपिकांचे झालेले नुकसान तातडीने भरून काढावे.

शेतकऱ्यांना सक्तीने दिले जाणारे सोलर पंप त्वरित थांबवून पूर्वीप्रमाणे विद्युत पंप उपलब्ध करून द्यावेत.

घटलेल्या सोयाबीन उत्पादनाला योग्य दर मिळावा व तातडीने खरेदी केंद्र सुरू करावे.

इमारत व इतर बांधकाम कामगारांचे ९० दिवसांचे काम प्रमाणपत्र देणे व नोंदणी करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी असून त्यात होत असलेल्या अडचणीवर तातडीने कारवाई करावी.

संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे नोव्हेंबर २०२४ पासूनचे थकलेले अनुदान तातडीने खात्यात जमा करावे.

ई-केवायसी, आधार अपडेट, मोबाइल मॅपिंगच्या नावाखाली होणारी लूट थांबवावी.

विद्युत विभागाकडून जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवणे त्वरित बंद करावे.

चांदूर बाजार तालुक्यात मंजूर झालेले पाणंद रस्ते अपूर्ण आहेत; ती कामे तातडीने पूर्ण करावीत.

Ladki bahan Yojana : लाडकी बहीण योजनेत तब्बल ४९०० कोटींचा भ्रष्टाचार?

आंदोलनाची पार्श्वभूमी

आंदोलनाच्या वेळी तहसीलदार आपल्या कार्यालयात उपस्थित नव्हते. महसूल विभागातर्फे आयोजित शिबिरात गेले असल्याने ते अनुपस्थित होते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी त्यांना परत बोलावण्याचा हट्ट धरला होता. शेवटी नायब तहसीलदारांनी तहसीलदारांसह तालुका कृषी अधिकारी व महावितरण अधिकाऱ्यांशी संवाद साधून चर्चा घडवून आणली.

या आंदोलनात प्रहारचे तालुकाध्यक्ष प्रदीप बंड, दिनेश अमझरे, संतोष किटुकले, राजेंद्र याऊल, मुन्ना बोंडे, प्रकाश निंभोरकर, सचिन पिसे, मनीष एकलारे, निखिल ठाकरे, आशिष बंड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.