Breaking

Bacchu kadu, Ravi Rana : लठधारी आमदार ‘पोस्टर’द्वारे बच्चू कडूंना डिचवले!

Potical Poster war in Amravati : अमरावतीत पोस्टर राजकारण चिघळले; राणांसोबतचा वाद पुन्हा उफाळला

Amravati जिल्ह्यातील राजकारण सध्या पोस्टरबाजीत अडकले आहे. आमदार रवी राणा आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या वादात आता आमदार प्रवीण तायडे यांचाही अप्रत्यक्ष सहभाग दिसून येत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या ‘लठधारी आमदार’ या पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.

अमरावती शहरात नुकतेच काही ठिकाणी अचलपूर मतदारसंघाचे आमदार तायडे यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा पोस्टर्स झळकले. मात्र या पोस्टरमधून अप्रत्यक्षपणे बच्चू कडूंना लक्ष्य करण्यात आले आहे. ‘लठधारी आमदार’ अशा उल्लेखासह लावण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये आमदार तायडे यांचा गौरव करण्यात आला असून, यातून बच्चू कडूंना थेट ललकारल्याचे संकेत मिळत आहेत.

Digital India : मानधनाविना हतबल; संगणक परिचालकांचा कामबंद एल्गार

काही आठवड्यांपूर्वी बच्चू कडूंनी बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून आमदार प्रवीण तायडे यांना लक्ष्य केल्याचा उल्लेख या पोस्टरच्या पार्श्वभूमीवर केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर देत, आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांच्या समर्थकांनी हे पोस्टर्स लावल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून मिळाली आहे.

या प्रकारामुळे राणा-कडू गटातील जुना संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पोस्टर लावणाऱ्यांच्या नावांवरून हे समर्थक कोणत्या गटाचे आहेत, हे स्पष्ट होत असून, यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

Yashwantrao Mukta Vasahat Yojana : शासनाचा ढिसाळ कारभार; मुक्त वसाहत योजनेत निधी परत!

दरम्यान, या पोस्टरवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नोंदवण्यात आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर यावरून चांगलीच चर्चा रंगली असून, नागरिकांमध्येही उत्सुकता वाढली आहे की, बच्चू कडू यावर काय प्रतिक्रिया देणार?