Scorching criticism against Ravi and Navneet Rana : रवी आणि नवनीत राणांवर झणझणीत टीका
Amravati: दिवाळीच्या उत्साहात अमरावतीच्या राजकीय वातावरणातही फटाक्यांचा आवाज कमी नव्हता, पण इथे फुटलेले फटाके राजकीय होते. बच्चू कडू यांनी जाहीर सभेतून राणा दाम्पत्यावर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर आरोपांची आतषबाजी केली. त्यांच्या भाषणाने अमरावतीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
बच्चू कडू यांनी थेट हल्लाबोल करत म्हटलं की, “याची बायको भाजपमध्ये आणि नवरा युवा स्वाभिमान पक्षात… हे कसला स्वाभिमान? तुम्हीच गटारगंगेत उभे राहून इतरांवर बोट दाखवता.” राणा दाम्पत्य देशातील सर्वात “नौटंकी जोडपं” असल्याची टीका करत कडूंनी त्यांच्यावर झणझणीत हल्ला केला. “याची बायकोच याच्या संघटनेत राहू शकत नाही, एवढी नाचक्की आहे,” असं टोला त्यांनी लगावला.
Mahavitaran : दिवाळीतच डिग्रस गावठाण अंधारात, नागरिकांचा संताप
बच्चू कडूंनी आपल्या भाषणात राणांवर वैयक्तिक आणि राजकीय दोन्ही स्तरांवर प्रहार केले. “दिवाळीच्या दिवशीदेखील राणांना माझी आठवण येते म्हणजे किती प्रेम आहे! देवधर्म सोडून माझी आठवण करतात, हेच दाखवतं की त्यांना माझ्याबद्दल किती जिव्हाळा आहे,” असा टोमणा त्यांनी मारला.
कडूंनी पुढे म्हटलं की, “मी विधान परिषदेसाठी करतो असं म्हणतात, पण हा धंदा त्यांचा आहे. ते सगळ्या पक्षांचा पाठिंबा घेऊन निवडणुका लढतात. कधी मशिदीत जातात, कधी मंदिरात जातात, कधी नमाज पडतात, तर कधी प्रभू रामचंद्रचं नाव घेतात हा त्यांचा राजकीय धंदा झाला आहे.”
आपल्या संघर्षाचा उल्लेख करत कडूंनी ठाम शब्दांत सांगितलं, “मी माझ्या ताकदीवर आमदार झालोय. कुण्या पक्षाच्या पाठिंब्यावर नाही. बच्चू कडू हा मरेपर्यंत कोणाच्या ओंजळीतलं पाणी पिणार नाही. आम्ही लढतो ते स्वतःच्या ताकदीवर. पण हे लोक वरून कार्यक्रम मिळाले की बोलायला लागतात.”
कडूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख करत आरोप केला की, “हा कार्यक्रमच फडणवीसांनी दिला. राणा दाम्पत्य फडणवीसांच्या सांगण्यावर बोलतं. ज्यांनी मोदींना शिव्या दिल्या, ते आज भाजपचे नेते झालेत. हे राणा दाम्पत्य शेतकरीविरोधी आणि शेतमजुराविरोधी आहेत. किराणा दिला म्हणजे दिव्यांगांची समस्या संपली का? त्यांनी एकदा तरी शेतकऱ्यांच्या आयुष्याकडे पाहावं.”
Illegal Sand Mining : रात्री वाळूचे ढिगारे, सकाळी विल्हेवाट!
नवनीत राणांवर टीका करत कडूंनी म्हटलं, “त्या मायमाऊलीला माहिती नाही की मी विधानसभेत किती वेळा बोललो. त्यांना माझ्या भाषणाची कॅसेट पाठवावी लागेल.” दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या वेळी आपण उपस्थित होतो, पण राणांची मजबुरी आहे, त्यांना वरून आदेश येतात, त्यांना बोलावं लागतं, अशी टीका बच्चू कडूंनी केली.
कडूंच्या या वक्तव्यांनी अमरावतीत राजकीय खळबळ उडाली असून राणा दाम्पत्याकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.