Sharad Pawar advised to take care of health : आंदोलनाकडे महाविकास आघाडीची धाव; सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
Amravati शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करून माजी मंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. अश्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील या आंदोलनाकडे धाव घेतली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील आंदोलनाची दखल घेतली आहे. त्यांनी फोन करून बच्चू कडू यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. तर आज, दि. ११ जूनला आमदार रोहित पवार आंदोलनाला भेट देणार आहेत. आता सरकार या आंदोलनाची कशी दखल घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
विविध पक्षांचे नेते, आमदार, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा दर्शवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर देखील ११ जून रोजी उपोषणस्थळी भेट देणार आहेत. त्यांनी आंदोलनास उघड पाठिंबा जाहीर केला आहे. माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांनीदेखील आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे.
MP Balwant Wankhede : खूप झाल्या बैठका, आता कामं करा, खासदारांनी सुनावले
नितेश कराळे गुरुजींनीदेखील आंदोलनस्थळी भेट देऊन कडू यांच्या लढ्याला पाठिंबा दिला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बच्चूभाऊ कडू यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे उद्या (११ जून) प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देणार आहेत, तसेच लक्ष्मण हाके यांनीदेखील आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
या आंदोलनाला राज्यभरातून मिळणारा वाढता पाठिंबा सरकारवर राजकीय आणि जनतेचा दबाव निर्माण करणारा ठरत असून, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित होत आहे.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार आणि तहसील कार्यालय समोर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. चांदुर बाजार येथील कार्यकर्त्यांनी धरणात आंदोलन केल्यानंतर मुंडन करून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारचा जाहीर निषेध केला आहे. या आंदोलनाची लोण इतर जिल्ह्यातील पेटण्याची शक्यता आहे.