Bacchu Kadu : आमदारांच्या घरापुढे टेंबे पेटवणार!

 

Statewide protest on April 11 over loan farmer’s waiver issue : कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ११ एप्रिलला राज्यभर आंदोलन

Amravati शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेकडून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ११ एप्रिल रोजी आमदारांच्या घरासमोर टेंबे पेटवून आंदोलन करण्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे.

बारामतीतील शिवनगर येथील दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड येथे एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार DCM Ajit Pawar यांनी शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत कर्ज भरण्याचे आवाहन केले होते. तसेच, पुढील वर्षीही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे महायुती सरकारने जाहीरनाम्यात दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण होण्याची शक्यता धूसर झाली आहे. यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे.

Bachhu Kadu : बच्चू कडू यांची आमदारकी गेली, आता जिल्हा बँकेचे अध्यक्षपदीही संकटात!

बच्चू कडू यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी कर्जमाफीच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गुढीपाडव्यानिमित्त बच्चू कडू यांनी प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. संघटनेच्या बळकटीसाठी ही बैठक आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सरकारने निवडणुकीच्या वेळी शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावाचे आश्वासन दिले होते. त्यासंदर्भात मोठे आंदोलन उभारणार आहोत,’ असं ते म्हणाले.

या आंदोलनाची सुरुवात ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व आमदारांच्या घरासमोर रात्री १२ वाजता गळ्यात निळा दुपट्टा आणि हातात भगवा झेंडा घेऊन टेंबे मशाल पेटवून केली जाईल. सरकारने निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पाळावीत. अन्यथा टेंबे मशालींनी आम्हाला पेटवून द्यावे, अशी भूमिका आम्ही मांडणार आहोत, असंही कडू म्हणाले.

Prataprao Jadhav, Ravikant Tupkar : सगळे म्हणतात आम्हीच सोडवला शेतकऱ्यांचा प्रश्न!

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही गुढीपाडव्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कर्जमाफीसंदर्भातील विधानाचा कोल्हापुरात निषेध केला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी गुढी उभारून सरकारचा निषेध नोंदवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी १०० दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करण्याचे आश्वासन दिले होते.