Breaking

Bacchu Kadu Strike : शरद पवारांचा फोन, मनोज जरांगेची भेट, अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस

Fourth day of strike, farmers, activists gather : बच्चू कडू यांची प्रकृती खालावली, शेतकरी कार्यकर्त्यांची गर्दी

Amaravati : गेल्या चार दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत असलेल्या माजी मंत्री बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना भेटण्यासाठी काही वेळ मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे? त्यांना नेमका काय त्रास होतोय? असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रहार संघटनेचे महाराष्ट्र भरातील कार्यकर्ते अमरावती शहरात दाखल होत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरीदेखील बच्चू कडू यांच्या गुरुकुंज मोझरी येथील उपोषणस्थळी जमा होत आहेत. असे असतानाच बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे.

Bachhu Kadu Hunger Strike: काहीही झाले तरी मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाहीच

बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला आहे. शरद पवार यांनी फोन करून बच्चू कडू यांची चौकशी केली होती. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी आज बच्चू कडू यांची भेट घेतली. या भेटीत जरांगे यांनी कडू यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच सरकारने बच्चू कडू यांच्या मागणींकडे लक्ष द्यायला हवे. त्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात, असे मत व्यक्त केले.

Bachhu Kadu on Nana Patole : अहो नाना, पहिले काँग्रेस कुठे आहे ते शोधा!

दुसरीकडे बच्चू कडू यांनी काहीही झालं तरी मी अन्नाचा एकही कण खाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मी माघार घेणार नाही. काहीही झालं तरी मी अन्नाचा कण खाणार नाही, असं स्पष्ट केलंय. त्यांचे 4 किलो वजन कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टर कार्यरत आहेत. काहीवेळ त्याची कोणालाही भेट घेता येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितलेले आहे.