Bacchu kadu with Ashok kharat : अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वाद; बच्चू कडूंच्या व्हिडिओने सोशल मीडियात खळबळ

Old video of bacchu kadu with Ashok kharat viral on social media: सत्कार स्वीकारल्यानंतर वाकून नमस्कार केल्याच्या प्रसंगाची चर्चा

Amravati नाशिक येथील कथित भोंदू कॅप्टन अशोक खरात आणि अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांच्याशी संबंधित एक छायाचित्र व व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रूपाली चाकणकर यांनी खरात प्रकरणानंतर राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ समोर आल्याने वाद अधिकच तीव्र झाला आहे. संबंधित व्हिडिओमध्ये बच्चू कडू हे अशोक खरात यांच्याकडून सत्कार स्वीकारताना आणि त्यांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका भाजप पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर शेअर केल्याने राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Ajit pawar plane crash : अजित पवार विमान अपघात प्रकरणाला नवे वळण

दरम्यान, बच्चू कडू यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना, हा प्रकार अपघाताने घडल्याचे सांगितले. सुमारे चार वर्षांपूर्वी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव एका मंदिरात गेले असताना अशोक खरात यांच्या संदर्भातील माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याचबरोबर, त्यांनी देशाचे गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विखे-पाटील यांचेसुद्धा खरात यांच्यासोबत छायाचित्र असल्याचा दावा करत, त्याबाबतही चौकशी करण्याचे आव्हान दिले. भाजपकडून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, आगामी काळात हा वाद आणखी चिघळणार की शांत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.